मुंबई

पामबीच मार्गावर अपघातात एकाचा मृत्यू

CD

पामबीच मार्गावर अपघातात एकाचा मृत्यू
दोघे गंभीर जखमी

नवी मुंबई, ता. ६ (वार्ताहर) : उलवे येथून पामबीच मार्गे वाशीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव वेगातील कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर चढून झाडांवर धडकल्याने झालेल्या अपघातात कारमधील एकाचा मृत्यू झाला, तर चालक व त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज पहाटे सीवूड्स येथे घडली.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांवर वाशीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एनआरआय पोलिसांनी या अपघातानंतर कार चालकाविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात मृत झालेल्याचे नाव राहुल हणमंत पवार (वय ३२, रा. उलवे) असे आहे. गंभीर जखमी झालेल्या कारचालकाचे नाव करण रवींद्र घरत (वय २३, रा. शेलघर) व अन्य एकाचे सुशांत नारायण ठाकूर (वय ३२, रा. न्हावा गाव) असे आहे. हे तिघेही गुरुवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास उलवे येथून पामबीच मार्गे वाशीच्या दिशेने जात होते. करण घरत हा कार चालवत होता, तसेच त्याच्या बाजूला सुशांत ठाकूर बसला होता; तर पाठीमागे राहुल पवार बसला होता. पामबीच मार्गावरून हे तिघेही कारमधून भरधाव वेगात वाशीच्या दिशेने जात असताना, सीवूड्स येथील टी. एस. चाणक्य मरिन ॲकॅडमीजवळ हा अपघात घडला. अपघातात कारमध्ये पाठीमागे बसलेला राहुल पवार याचा जागीच मृत्यू झाला, तर करण आणि सुशांत हे दोघे गंभीर जखमी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Babasaheb Patil RBI action : सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर RBIची कारवाई; नियमांचे उल्लंघन केल्याने जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून बडतर्फ?

Western Ghats Biodiversity : सह्याद्रीच्या कुशीत दडलाय अमूल्य खजिना! आजरा परिसरात सापडल्या शेकडो दुर्मीळ औषधी वनस्पती; टाटा संस्थेकडून सर्वेक्षण

दुष्काळात कुणी खाईना का? ५०-६० रुपयांचे ड्रायफ्रूट्स, राईचा पर्वत करायची काय गरज? काजू-बदाम खाणाऱ्या खासदाराची प्रतिक्रिया

Latest Marathi News Update : गोकुळ निवडणुकीमध्ये भाजप सर्व 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार

Asian Games: जपानमध्ये भारतीय नेमबाजांचे मोठे हाल! राही सरनोबतच्या हॉटेल बुकिंगबाबत घडला विचित्र प्रकार उघड

SCROLL FOR NEXT