मुंबई

आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्ज राहा!

CD

आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्ज राहा!

भिवंडी, ता. ६ (बातमीदार) : शहरातील इंदिरा गांधी रुग्णालयासमोर असलेल्या अग्निशमन दलाच्या मुख्य विभागाला भेट देऊन पावसाळ्यात येणाऱ्या आपत्तीपासून बचाव करणाऱ्या साहित्याची पाहणी करून आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी आपत्ती व्यवस्थापनास दिले.
भिवंडी महापालिका क्षेत्रालगत आणि ग्रामीण महसूल विभागाच्या क्षेत्रालगत कामवारी नदी आणि वसईच्या खाडीचे पात्र असून या पात्राकिनारी अनेक धनदांडग्यांनी अतिक्रमण केले आहे. नदी व खाडीपात्रात कचरा, माती टाकून अतिक्रमण करीत झोपडपट्ट्या वसवल्या आहेत. ऐन पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास अथवा खाडीत भरतीचे पाणी आल्यास किनाऱ्यावरील लोकवस्तीचा धोका होतो. त्या वेळी आपत्ती व्यवस्थापनास आपले प्राण धोक्यात घालून नागरिकांना वाचवावे लागते. त्यामुळे अशा अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. आपत्कालीन परिस्थितीबाबत अग्निशमन विभागातील कर्मचारी व अधिकारी यांची आयुक्तांनी बैठक घेतली व अग्निशमन विभागातील वाहनांची, साधनांची पाहणी केली. तसेच अचानक उद्भवणाऱ्या आपत्तीजन्य परिस्थितीसाठी तोंड देण्याची तयारी ठेवा, असे निर्देश दिले. या वेळेला मुख्य अग्निशमन अधिकारी राजेश पवार व अन्य कर्मचारीवर्ग उपस्थित होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Human Story : भावा हे कोल्हापूर आहे ! महावीर जयंतीनिमीत्त मराठा समाजातील व्यक्तीने जैन समाजाला केली कोट्यावधींची जमीन दान; असा आहे जिव्हाळा

Karad Chemical: तासवडेत स्फाेटांची मालिका सुरूच; केमिकल कंपनीत कॅन फुटून स्फाेट, ‘प्रदूषण’चे निरीक्षण!

Latest Marathi News Live Update : अंजनगावात शिवरायांच्या पुतळ्यावरून तणाव! दोन समाज आमनेसामने

त्यांना चालता येत नव्हतं... शेवटच्या दिवसांत अशी झालेली विक्रम गोखलेंची अवस्था; मराठी अभिनेत्री म्हणाली, 'त्यांच्या पोटात...'

Wife Rights India : पतीच्या मृत्यूनंतरही पत्नीला मिळते पोटगी, हायकोर्टाचा मोठा निर्णय; नेमकं काय आहे प्रकरण ?

SCROLL FOR NEXT