मुंबई

चेंबूर येथे गॅस सिलेंडर स्फोटात ९ जण जखमी

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : चेंबूर परिसरातील गोल्फ क्लबजवळ असलेल्या एकमजली घरात झालेल्या सिलिंडर स्फोटात नऊ जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी पावणेआठ वाजता घडली. यात नऊ जण जखमी झाले असून एकाच कुटुंबातील आठ जणांचा समावेश आहे. अग्निशमन दलाला माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. तासाभरातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाने दिली.

चेंबूर परिसरातील गिडवाणी मार्गावर झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण परिसर हादरला. स्फोटाच्या आवाजाने बाजूच्या घरांच्या आणि वाहनांच्या काचा फुटल्या. अचानक झालेल्या मोठ्या आवाजाने परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ओम लिंबाजिया (९), अजय लिंबाजिया (३३), पूनम लिंबाजिया ( ३५), मेहक लिंबाजिया (११), ज्योत्स्ना लिंबाजिया (५३), पीयूष लिंबाजिया (२५), नितीन लिंबाजिया (५५), प्रीती लिंबाजिया (३४), सुदाम शिरसाट (५५) अशी जखमींची नावे आहेत. या घटनेची पोलिस, अग्निशमन दल आणि संबंधित यंत्रणांकडून चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.
---
आठ जखमींना ऐरोलीत हलवले
गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात उपचार केल्यानंतर ५० टक्के भाजलेल्या आठ रुग्णांना ऐरोली येथील नॅशनल बर्न केंद्रात दाखल करण्यात आले आहे. एकावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्योत्स्ना लिंबाचिया या ६५ टक्के भाजल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. प्रिती लिंबाचिया या ४५ ते ५० टक्के भाजल्या असून संसर्गाचा धोका असल्याने प्रतिबंधात्मक उपचार म्हणून नॅशनल बर्न केंद्रात पाठवण्यात येणार आहे. नऊ वर्षीय मुलाचाही यात समावेश असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील पाकळे यांनी सांगितले. घटनेनंतर खासदार अनिल देसाई यांनी गोवंडी रुग्णालयात दाखल रुग्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja 2026 First Look: मुंबईच्या राजाचं पहिलं दर्शन आज! लालबागच्या राजाचा LIVE सोहळा कुठे पाहाल?

Pune Fraud News : आजार बरा करण्‍याच्‍या बहाण्‍याने भोंदू महिलेने उकळले ४५ हजार; बिबवेवाडीतील भोंदू मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

PF खात्यातून इमर्जन्सीत पैसे काढायचे आहेत? EPFO ने बदलले नियम, आता मिळतील 'इतके' टक्के पैसे!

Latest Marathi News Live Update : ३५ दिवसांचा दुष्काळी खंड संपला; यवतमाळ-वणीत पावसाची दमदार हजेरी, पिकांना जीवदान

Madhuri Elephant Nandani Math : माधुरी हत्ती नांदणी मठातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? वनताराकडून सूचनांची आली यादी

SCROLL FOR NEXT