मुंबई

धावत्या लोकलमधून प्रवाशांच्या उड्या

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : भायखळा रेल्वे स्थानकांवर अचानक धूर पसरल्याने घाबरलेल्या प्रवाशांनी फलाटावर उड्या मारल्याची घटना घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही; परंतु स्थानकांवर धूर कशामुळे आला, हे अस्पष्ट आहे.
सीएसएमटीवरून ४.३० वाजताची मार्गस्थ झालेली ठाणे लोकल भायखळा स्थानकातील फलाट क्रमांक एकवर आली. त्यापूर्वीच फलाटावर सर्वत्र धूर पसरला होता. काही कळण्यापूर्वीच लोकल निर्धारित वेळेत मार्गस्थ झाल्याने घाबरलेल्या प्रवांशांनी आरडाओरडा सुरी केली. लोकलला आग लागल्याच्या शंकेने अनेकांनी जीव मुठीत घेत थेट फलाटावरच उडी घेतली. त्यानंतर लोकल थांबवण्यात आली. या वेळी रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, स्थानकांवर धूर कशामुळे आला, याचे कारण अद्याप स्पष्ट नाही. महत्त्वाचे म्हणजे फलाट क्रमांक ३ वरून रेल्वेचे डिझेल इंजिन गेल्यामुळे हा धूर झाल्याचे बोलण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Shortage : केंद्राकडून महाराष्ट्रासाठी 'एवढं' रॉकेल मंजूर; एका शिधापत्रिकेसाठी किती पुरवठा होणार?

Latest Marathi News Live Update : भारतात लॉकडाऊनच्या अफवा पूर्णपणे निराधार-हरदीप पुरी

Sanjay Raut criticism government : सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे देश पुन्हा 'रॉकेलच्या रांगेत'; संजय राऊत यांचा घणाघाती प्रहार

Childhood Diabetes and Heart Disease: दरवर्षी हजारो मुलांमध्ये टाइप-१ मधुमेह; २५ हजार नवजात बालकांना जन्मजात हृदयरोगाचीही होतेय नोंद

Jalgaon Road Accident : सप्तशृंगी पदयात्रेसाठी पायी निघालेल्या महिलेचा दुर्दैवी अंत; सैन्य अधिकारी चालवत होता कार, टायर फुटले अन्...

SCROLL FOR NEXT