मुंबई

आयुर्वेदीक औषधांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

CD

मुंबई, ता. ६ ः आर. डी. नॅशनल कॉलेजच्या नेचर्स क्लब व सुशीला आयुर्वेद संशोधन केंद्र, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शोध नैसर्गिक औषधींचा अर्थात औषधी वनस्पतींचे महत्त्व ‘जागतिक पर्यावरण दिवस २०२४’ सांगण्यात येणार आहे. यानिमित्ताने शनिवारी (ता. ८) संध्याकाळी ४ ते ६ दरम्यान वांद्र्यातील आर. डी. ॲन्ड एस. एच. नॅशनल कॉलेजमध्ये आयुर्वेदिक क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
आजच्या धकाधकीच्या जीवनात शहरातील नागरिकांच्या आयुष्यात ताण ही गोष्ट नित्याची झाली आहे. यासाठी शोध निसर्गातील औषधींचा औषधी वनस्पतींच्या उपचार क्षमतेची जाणीव करण्याच्या हेतूने आर. डी. नॅशनल कॉलेज सुशीला आयुर्वेद रिसर्च सेंटर नाशिक यांच्यासमवेत औषधी वनस्पतींची उपयुक्तता दाखवणारे कायमस्वरूपी प्रदर्शन होणार आहे. या प्रदर्शनाचा हेतू औषधी वनस्पतींविषयी, औषध कंपन्यांनी जागरूकता वाढवावी, त्यांच्या लागवडीची व्याप्ती वाढावी, याबाबत जागरूकता करणे, हा आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत आहे.
--------------------------------------------
आयुर्वेद प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष व श्री धुपापेश्वरचे कार्यकारी संचालक रणजीत पुराणिक तसेच आयुर्वेद संचालक रमान प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. तसेच आर. डी. नॅशनल कॉलेजमध्ये नैसर्गिक औषधांच्या वर्गीकरण शास्त्रामध्ये तीस वर्षांपेक्षा अधिक अनुभव असलेल्या डॉ. सुचन्द्रा दत्ता यांच्या मार्गदर्शनाखाली, आयुर्वेद संशोधक वैद्य विक्रांत जाधव मार्गदर्शन करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-US Ceasefire : अमेरिका-इराणमध्ये शस्त्रसंधीची घोषणा होताच कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण; पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

Gold Rate Today: युद्ध थांबल्याने सोन्याचे भावात अचानक मोठा बदल! काय आहे आजचा ताजा भाव?

Aachara Agitation : तळाशील वाचवा, कोकण वाचवा! खाडीत उतरून महिलांचं आंदोलन, महिलेची प्रकृती बिघडली

Latest Marathi News Live Update: वर्क फ्रॉम होमच्या आमिषाने 17 लाखांची फसवणूक; एक आरोपी अटकेत

Video Viral : शार्दूल ठाकूरने बाद करताच वैभव सूर्यवंशी ढसाढसा रडला; तो फटका का खेळला? स्वतःवरच चिडला

SCROLL FOR NEXT