मुंबई

पालिकेच्या अभियंत्यावर निलंबनाची कारवाई

CD

पालिकेच्या अभियंत्यावर निलंबनाची कारवाई

वेसावेतील अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष; आयुक्तांच्या निर्देशांचे अवमानप्रकरणी कारणे दाखवा नोटीस

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : अंधेरीच्या के पश्चिम विभागांतर्गत वेसावे (वर्सोवा) येथे सागरी किनारा क्षेत्रात अनधिकृत बांधकामांवर दुर्लक्ष केल्याप्रकरणी दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे; तर पदनिर्देशित अधिकारी स्वप्नील कोळेकर यांचीही बदली करण्यात आली. सोबतच पालिका आयुक्तांच्या समक्ष बैठकीस उपस्थित राहण्याची सूचना दिल्यानंतरही गैरहजर राहून निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल शिंदे यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. प्रशासकीय कामकाज आणि जबाबदाऱ्या यामध्ये कोणीही बेजबाबदारपणा, दुर्लक्ष आणि निष्काळजीपणा करू नये, अन्यथा त्यांनाही कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा आयुक्त भूषण गगराणी यांनी दिला आहे.

अंधेरी विभागात २०२२ पासून कार्यरत असलेले दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांच्याकडे प्रभाग क्रमांक ५९, ६० आणि ६३ यांचा कार्यभार सोपवण्यात आला होता. प्रभाग क्रमांक ५९ आणि ६३ यामध्ये अनधिकृत बांधकामे, अनधिकृत फेरफार, जमिनीवरील बांधकामे, विशेषतः वेसावे येथे सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन परिसरात व दलदलीच्या जमिनीवर अनधिकृत बांधकामांविषयी प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत होत्या. याप्रकरणी सहआयुक्त विश्वास शंकरवार आणि के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहान यांनी दखल घेत कारवाईच्या सूचना सोमेश शिंदे यांना दिल्या होत्या. त्यातच वेसावे भागातील अनधिकृत बांधकामांविषयी पालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांना सविस्तर माहिती देऊन निष्कासनाची कारवाई ३ जून रोजी नियोजित करण्यात आली, मात्र यावेळी निर्देश मिळाल्यानंतरही शिंदे यांनी निष्कासनासाठी कोणतीही तयारी केली नाही. यामुळे पालिकेने शुक्रवारी (ता. ६) शिंदे यांच्यावर ही कारवाई केली.

..
खाते अंतर्गत चौकशी
वेसावे भागातील अनधिकृत बांधकामांवर ३ व ४ जून रोजी प्रत्यक्ष निष्कासन कारवाई सुरू असताना सोमेश शिंदे यांनी निष्क्रियता दाखवली. या कारवाई वेळी शिंदे हे खासगी वाहनात वातानुकूलन यंत्रणा सुरू करून बसून होते. या सर्व प्रकाराची दखल घेत पालिका प्रशासनाने शिंदे यांच्यावर खाते अंतर्गत चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबनाची कावाई केली.

.......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT