मुंबई

रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न अधिवेशनात

CD

डहाणू, ता. ८ (बातमीदार) : नगर परिषदेच्या विकास आराखड्याप्रमाणे रस्ता रुंदीकरणासाठी जमीन अधिग्रहण करण्याचे काम सुरू आहे. त्यात असणारी तफावत आगामी विधानसभेच्या अधिवेशनात सरकारसोबत चर्चा करून सोडविण्याचा प्रयत्न करेन, असे आश्वासन आमदार विनोद निकोले यांनी बाधित नागरिकांना दिले.

डहाणू नगर परिषदेमार्फत मंजूर विकास आराखड्याप्रमाणे महिन्याभरापासून रस्ता रुंदीकरणासाठी जमीन अधिग्रहण करण्याचे काम सुरू आहे. डहाणू रोड रेल्वेस्थानक ते चंदिका हॉटेलपर्यंत (१८ मीटर), चंद्रिका हॉटेल ते सागर नाका (२४ मीटर) आणि सागर नाका ते पारनाका ३० मीटर रुंदीकरण असणार आहे. त्याप्रमाणे जेसीबीच्या साह्याने आणि प्रचंड पोलिस बंदोबस्तात रुंदीकरणासाठी घरे, दुकाने, आस्थापनांच्या समोरील भाग तोडला जात आहे. त्यात डहाणू रोड रेल्वेस्थानक ते चंद्रिका हॉटेल आणि चंद्रिका हॉटेल ते सागर नाकापर्यंत सहा मीटर रुंदीची तफावत न ठेवता डहाणू रोड रेल्वेस्थानक ते सागर नाक्यापर्यंत समान रुंदी ठेवावी, अशी बाधित नागरिकांची मागणी आहे.

नागरिकांच्या मागणीसंदर्भात शुक्रवारी (ता. ७) आमदार विनोद निकोले यांनी बाधित नागरिकांसमवेत मुख्याधिकारी तथा प्रशासक वैभव आवारे यांची भेट घेतली. डहाणू नगर परिषदेच्या विकास आराखड्याप्रमाणे रस्त्याची रुंदी करण्याचे काम सुरू आहे. त्यात कमी-जास्त माप करण्याचा अधिकार सरकारचा असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले. त्यामुळे रस्त्याच्या रुंदीकरणासाठी लागणाऱ्या जमिनीचे अधिग्रहण करण्याचा प्रश्न येत्या विधानसभा अधिवेशनात प्रश्नाच्या रूपाने मांडून त्यांची सोडवणूक करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करेन, असे आश्वासन निकोले यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश! शेंदूरवाड्यात १० केव्हीचा नवीन ट्रान्सफॉर्मर सुरू; शेतकऱ्यांना आता आठ तास वीजपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा

Rafale Marine : भारतीय नौदलाच्या हवाई सामर्थ्यात भर! आयएनएस विक्रांतवर राफेल मरीनचे यशस्वी लँडिंग

Marathi News Live Updates : माजी मंत्री तानाजी सावंतांच्या कार्यकर्त्याकडून रविराज साबळे यांना घरात घुसून जिवे मारण्याची धमकी; दिवाळी किट वाटपावरून वाद!

RO-KO ची न्यूझीलंडमध्ये जोरदार तयारी! BCCI ने विराट-रोहितचा शेअर केला खास Video; कधी सुरू होणार वनडे मालिका?

Amit Shah: संसदेत होणार 'आर-पार'ची लढाई! 'मत चोरी'च्या मुद्द्यावरुन अमित शाहांचं राहुल गांधींसह अखिलेश यादवांना आव्हान

SCROLL FOR NEXT