मुंबई

बदलापूरहुन बाप्पा निघाले अमेरिकेला

CD

मोहिनी जाधव : सकाळ वृत्तसेवा
बदलापूर, ता. ८ : गणपती बाप्पांची स्वारी बदलापूर शहरातून अमेरिकेला निघाली आहे. जगभरात विविध देशांत राहणाऱ्या भारतीयांना गणेशोत्सव साजरा करता यावा, यासाठी बदलापूरमधील चिंतामणी क्रिएशन्सच्या माध्यमातून मागील आठ वर्षांपासून हजारो पर्यावरणपूरक गणेशमूर्ती परदेशात पाठवल्या जात आहेत. यंदादेखील साधारण ८० हजार मूर्ती परदेशात रवाना झाल्या आहेत.

गणेशचतुर्थीला अवघे तीन महिने शिल्लक असून परदेशात आफ्रिका खंड व इतर पाश्चिमात्य देश उदा. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, दुबई, सिंगापूर, मॉरिशस, अमेरिका इत्यादी देशात बदलापूरच्या चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून गणपती बाप्पाच्या मूर्ती निर्यात केल्या जातात. साधारण मार्चपासून गणपती बाप्पाच्या मूर्ती निर्यातीला सुरुवात झाली आहे. दुबईला भारतातील सगळ्यात मोठे उद्योजक धनंजय दातार यांनी चिंतामणी क्रिएशन्सच्या माध्यमातून बाप्पाच्या मूर्ती आयात केल्या आहेत; तर कॅनडा, आफ्रिका व अमेरिकेतील शिकागो येथे साधारण दोन हजार बाप्पाच्या मूर्ती निर्यात केल्या आहेत. समुद्रमार्गे बाप्पाच्या मूर्तींचा होणारा प्रवास हा सुखरूप आणि सुरळीत व्हावा, यासाठी चांगल्या दर्जाच्या पॅकिंगमधून मूर्ती पाठवल्या जातात. त्यात मुख्य म्हणजे सगळ्या मूर्ती या शाडूच्या मातीच्या आहेत. त्यामुळे खूप सावधानतेने हाताळाव्या लागतात, यासाठी सगळ्यांची नियोजनपूरक व्यवस्था करण्याचे काम चिंतामणी क्रिएशन्सचे सर्वेसर्वा निमेश जनवाड हे करत आहेत.

निमेश जनवाड या तरुण उद्योजकाने सात वर्षांपासून परदेशात गणेशमूर्तींच्या निर्यातीला सुरुवात केली. निमेश जनवाड या तरुणाला परदेशात हा व्यवसाय करण्यासाठी दुबईतील मसालाकिंग धनंजय दातार यांनी प्रथम संधी दिली आणि इथून चिंतामणी क्रिएशन्सचा हा प्रवास सुरू झाला. साधारण २०१७ मध्ये या व्यवसायाची सुरुवात झाली. त्यानंतर, २०१८ मध्ये तीन हजार, २०१९ मध्ये साडेतीन हजार गणेशमूर्ती परदेशात पाठवल्या. २०२० रोजी कोरोनामुळे हा व्यवसाय बंद झाल्याने जनवाड यांना लाखोंचा फटका बसला होता; मात्र या संकटातसुद्धा त्यांनी हार न मानता २०२१ मध्ये त्यांनी या व्यवसायात मोठी झेप घेतली. २०२१ मध्ये त्यांनी तब्बल वीस हजार गणेशमूर्ती निर्यात केल्या. २०२२ मध्ये ३५ हजार; तर २०२३ मध्ये ५० हजार गणेशमूर्ती परदेशात रवाना केल्या. यंदाच्या वर्षी जगभरात ८० हजार गणेशमूर्ती पाठवल्या आहेत.


मागील आठ वर्षांपासून बदलापूरहून सुरू केलेला हा प्रवास आता परदेशात पोहोचला आहे. त्यात परदेशातून दरवर्षी वाढत जाणाऱ्या प्रतिसादामुळे माझ्यावर एक वेगळी जबाबदारी वाढली आहे. या जबाबदारीचे पाईक होण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करत असून, पुढच्या वर्षी लाखाच्या वर मूर्ती परदेशात रवाना करण्याचा मानस असून, हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण चिंतामणी क्रिएशनची टीम विशेष मेहनत घेत आहे.

- निमेश जनवाड
उद्योजक,
चिंतामणी क्रिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आयुर्वेदिक डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्याची परवानगी; राज्य सरकारचा मोठा निर्णय, पण ॲलोपॅथिक डॉक्टरांचा विरोध

Stock Market IPO : या IPO ला तब्बल 1000 पट सब्स्क्रिप्शन; GMP मध्येही चमक, गुंतवणूकदारांना पैसा डबल करण्याची संधी?

Pune Election : तीन दिवसांत ६७२ अर्ज नेले; नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारांची गर्दी; मात्र प्रत्यक्षात फक्त एक अर्ज दाखल!

Ambegaon Political : युती-अनिश्चिततेत वंचित बहुजन आघाडी आक्रमक; बालाजीनगर प्रभागात पाचही जागा स्वबळावर लढवणार!

Latest Marathi News Live Update : बर्च बाय रोमियो लेन आग प्रकरणातील लुथरा ब्रदर्स यांच्या पोलीस कोठडीत वाढ

SCROLL FOR NEXT