मुंबई

वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

CD

उरण, ता. ८ (बातमीदार) : उरण तालुक्यातील पिरकोन गावचे युवा सामाजिक कार्यकर्ते आणि केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे उरण पूर्व विभाग अध्यक्ष अनिल घरत यांचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत सारसई विभागातील बागेचीवाडी, सोनारवाडी, गोविंदाचीवाडी, टोकाचीवाडी, खडकीचीवाडी, टपोरवाडी, धनगरवाडी, माडभुवन या आदिवासी वाड्यांवरील आदिवासींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
युवा सामाजिक कार्यकर्ते अनिल घरत यांचा जन्मदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा व्हावा आणि त्यातून गरीब, गरजवंत लोकांना भेट स्वरूपात काही तरी जीवनावश्यक वस्तूरूपी मदत मिळावी, हा उद्देश ठेवण्यात आला होता. यासाठी केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून डाबर इंडिया कंपनीच्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आपटा ग्रामपंचायत हद्दीतील सारसई विभागातील आठ आदिवासी वाड्यांवरील आदिवासी बांधवांना करण्यात आले. कार्यक्रमावेळी आदिवासी महिलांनी अनिल घरत यांना ओवाळणी करून औक्षण केले. तसेच केक कापून जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा स्नेहल पालकर, संदेश घरत यांच्यासह सारसई विभागातील युवा सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंगाडे, तसेच आठ आदिवासी वाड्यांवरील आदिवासी बांधव आणि आदिवासी महिला भगिनी यांच्या उपस्थितीत हा अनोखा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Edible Oil Import Duty Cut : सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेल होणार स्वस्त; केंद्र सरकारकडून खाद्यतेलाच्या आयात शुल्कात मोठी कपात, सामान्यांना दिलासा

धोनीचा असा जल्लोष परत कधीचं पाहिला नाही! पहिला T20 World Cup जिंकल्यावरच्या सेलिब्रेशनचा Viral Video

अजय देवगणच्या अडचणीत वाढ? मुंबईतील जुहू बंगल्यावर BMC कारवाई, पण नक्की कारण काय?

Congress MLA Resignation : मतदार संघात दुष्काळ जाहीर न केल्याने काँग्रेस आमदार पाटील यांचा राजीनामा

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट; अहेरी दक्षिण भागात मुसळधार पावसाची सुरुवात

SCROLL FOR NEXT