मुंबई

आंध्र प्रदेशच्या धर्तीवर त्वरित आरक्षण द्या

CD

आंध्र प्रदेशच्या धर्तीवर त्वरित आरक्षण द्या
नसीम खान ः मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाला आरक्षण द्या


मुंबई, ता. ८ : आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात मराठा, मुस्लिम व धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी माजी मंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी केली आहे. या आरक्षणाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. या समाजातील नागरिकांना मागासलेपणाच्या आधारावर आरक्षण दिले पाहिजे.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारमधील घटक पक्ष असलेल्या तेलुगू देसम पक्षाने आंध्र प्रदेशात मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यास कट्टिबद्ध असल्याचे स्पष्ट केलेले आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही ते दिले पाहिजे, अशी मागणीही खान यांनी केली आहे.

केंद्रात भाजपचे सरकार असून राज्यातही त्यांचेच सरकार आहे. त्यामुळे त्यांनी तातडीने आरक्षणाचा कायदा करावा. २०१४ मध्ये काँग्रेस आघाडी सरकारने मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण दिले होते. मुस्लिम आरक्षणावर उच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले होते, त्याची आठवण नसीम खान यांनी या वेळी करून दिली.
आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी; तसेच जातनिहाय जनगणना करावी, अशी भूमिका काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी मांडलेली आहे. त्याप्रमाणे सरकारने कार्यवाही केली, तर जे समाज आरक्षणाची मागणी करत आहेत, त्यांना आरक्षण देणे सोयीचे होईल, असेही नसीम खान म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT