मुंबई

मेट्रो कामात कर्णकर्कश आवाज कर्णकर्कश आवाजाने रहिवासी त्रस्त

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ११ : कल्याण-तळोजा मेट्रो मार्ग प्रकल्पाचे कल्याण-शीळ रोडवरील कामाला एमएमआरडीएने सुरुवात केली आहे. रस्त्याच्या मधोमध खांब उभारणीसाठी मोठमोठ्या मशीनच्या साह्याने खड्डे खणले जात आहेत. या मशीनच्या कर्णकर्कश आवाजाने मात्र परिसरातील नागरिक हैराण झाले आहे. दिवसरात्र हे काम सुरू असल्याने त्याचा त्रास होत असून किमान रात्रीच्या वेळी हे काम बंद ठेवण्यात यावे, अशी मागणी येथील रहिवासी करत आहेत.
कल्याण-शीळ मार्गावर तळोजा-कल्याण मेट्रो मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. विको नाका ते सोनारपाडा, डोंबिवली नागरी सहकारी बॅंकपर्यंत हे काम सुरू असून खांब टाकण्यासाठी खोदकाम केले जात आहे. या खोदकामासाठी मोठ्या मशीन आणण्यात आल्या आहेत. मात्र, त्या मशीनच्या आवाजाने नागरिक त्रासले आहेत. खोदकामामुळे माती, सिमेंटचा धुरळा उडत आहे. हा धुरळा घरे, दुकानांत साचून त्याचा थर जमा होत आहे. महिनाभरापासून दिवसरात्र हे काम सुरू असल्याने रात्रीची शांत झोप नागरिकांना मिळेनाशी झाली आहे. येथील बहुतांश रहिवासी हे नोकरदार, व्यावसायिक आहेत. दिवसभर कामावरून थकून आल्यावर शांत झोप घ्यायचा त्यांनी विचार केला, तर या खोदकामाने त्यांच्या झोपेचे खोबरे झाले आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्णांना तसेच घरात राहणाऱ्या नागरिकांना याचा दिवसरात्र कानावर आवाज पडल्याने सर्वाधिक त्रास होतो.

एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना भेटण्याचा सल्ला
एमआयडीसीतील रहिवाशांनी शिळफाटा रस्त्यावर खोदकाम करणाऱ्या ठेकेदाराची भेट घेऊन रात्रीच्या वेळेत कर्णकर्कश आवाज करत खोदकाम करू नका, अशी मागणी केली. ठेकेदाराने याविषयी रात्रीचे काम थांबवायचे असेल तर तुम्ही एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटा, असे रहिवाशांना सांगितल्याचे स्थानिक रहिवासी राजू नलावडे यांनी सांगितले.

कोट्यवधी रुपयांचा चुराडा
शिळफाटा रस्त्याचे नुकतेच सिमेंट कॉंक्रीटीकरण करण्यात आले होते. तसेच दुभाजके बसवून त्यात झाडे लावण्यात आली. हे काम पूर्ण झाल्यानंतर एमएमआरडीएने या नवीन तयार रस्त्याच्या दोन मार्ग अडवून खांबासाठी खोदकाम सुरू केले आहे. रस्त्यावरील दुभाजक आणि त्यामध्ये लावलेली झाडे, पथदिवे हे काढून टाकण्यात आली आहेत. जर मेट्रोचे काम नियोजित होते तर हा रस्त्यावरील खर्च करायला नको पाहिजे होता. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला. शिवाय, दुभाजकामधील पूर्ण वाढ झालेली झाडेही काढण्यात आल्याने तोही पैसा पाण्यात गेल्याचे नलावडे यांनी सांगितले.

पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी
शिळफाटा रस्त्याच्या दुभाजकामध्ये नारळी, शोभेची अनेक झाडे लावण्यात आली होती. ही सर्व झाडे मुळासकट उपटून टाकण्यात आली आहेत. याविषयी पर्यावरणप्रेमी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. या रस्त्यावरून जेवढी झाडे बाधित होणार आहेत. त्याच्या दुप्पट झाडे प्राधिकरणाने ठेकेदाराकडून लावून घेण्याची मागणी पर्यावरणप्रेमी नागरिक करत आहेत.

वाहतूक कोंडीची भीती
मेट्रोच्या कामासाठी ठाण्यातील घोडबंदर रस्ता जसा दोन ते तीन वर्षांपासून वाहतूक कोंडीत अडकत आहेत, तीच परिस्थिती आता कल्याण-शिळफाटा रस्त्यावर निर्माण होण्याची भीती प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

SCROLL FOR NEXT