मुंबई

स्वयं पुनर्विकासासाठी सोसायट्यांनी पुढाकार घ्यावा

CD

स्वयं पुनर्विकासासाठी सोसायट्यांनी पुढाकार घ्यावा
मुलुंड, ता. ९ (बातमीदार) ः मुलुंड पूर्वेतील टाटा कॉलनी येथे स्‍वयं पुनर्विकास योजनेंतर्गत पूर्वरंग सहकारी गृहनिर्माण संस्था या सोसायटीला माजी नगरसेवक आणि मुंबई डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी भेट दिली. या सोसायटीच्या सदस्यांनी स्वयं पुनर्विकास प्रकल्प बांधून अनेक सोसायटींना आदर्श दिला आहे. विशेष म्हणजे, सोसायटी सभासदांची आधी ४०० चौरस फुटाची सदनिका होती. आता ती एकूण १,००० चौरस फुटाची झाली असून यामध्ये अत्याधुनिक सुख-सुविधा पुरविण्यात आल्या आहेत, असे ते म्‍हणाले. गृहनिर्माण संस्थांनी स्वयं पुनर्विकासासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन गंगाधरे यांनी केले. पूर्वरंग सोसायटीने घेतलेल्या निर्णयामुळे सर्व सदस्यांना मोठी जागा राहायला मिळाली. ही बाब कौतुकास्पद असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. याप्रसंगी माजी नगरसेवक नंदकुमार वैती, सोसायटी सेक्रेटरी मिलिंद महाडिक, सभासद राकेश गायकवाड, बाळकृष्ण दुमने, दिगंबर नाईक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Railway Update : शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज! कमी खर्चात आणि कमी वेळेत शेतमाल थेट दिल्लीला पोहोचणार! मिरज ते मुंबई 'किसान रेल'चा मार्ग कसा झाला मोकळा?

Fifa World Cup Round of 32: अर्जेंटिना, फ्रान्स, ब्राझीलसह १२ संघ बाद फेरीत पोहोचले; पोर्तुगालचे गणित बिघडले, जाणून घ्या Scenario

Latest Marathi News Live Update : अमरावतीत काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसचे प्रकाश साबळे यांचा रवी राणांच्या पक्षात पक्षप्रवेश

अखेर 'मुरांबा' निरोप घेणार; शशांक केतकरने शेअर केले फोटो, सांगितलं कसा होणार मालिकेचा शेवट

Chandoli Dam Rainfall : चांदोली, कोयना धरणात परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग! पाथरपुंजमध्ये 172 मिमी पाऊस; महाबळेश्वर, नवजा खोऱ्यात काय परिस्थिती?

SCROLL FOR NEXT