मुंबई

पालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा!

CD

पालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा!
पवईतील कारवाई नियमबाह्य झाल्‍याचा आरोप
घाटकोपर, ता. ९ (बातमीदार) ः पवईतील भीमनगरमध्ये राहणाऱ्या जवळपास ५०० झोपडपट्टीधारकांच्या घरांवर महानगरपालिकेने तोडक कारवाई करून ऐन पावसाळ्यात त्यांना बेघर केले आहे. २००० पूर्वीपासून या ठिकाणी राहत असलेल्या रहिवाशांवर पात्रता निश्चित न करता, सर्व्हे न करता त्यांची घरे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. ही कारवाई अन्यायकारी असून नियम डावलून कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सरकारने कडक कारवाई करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेस स्लम सेलचे अध्यक्ष सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे. या गरीब लोकांची पात्रता निश्चित करून त्‍यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करावे, अशी मागणीही त्‍यांनी केली आहे. १ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत कोणत्याही प्रकारचे घर पाडू नये, असे आदेश असतानाही पालिकेने ही कारवाई केली, असे राजहंस म्‍हणाले.


मुख्यमंत्र्यांची भेट घेणार ः लांडे
पवईतील कारवाई न्यायालयाच्या आदेशानुसारच झाली असून गरीब झोपडीधारकांना घरे मिळावीत, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्‍याचे पत्रकार परिषद घेऊन आमदार दिलीप लांडे यांनी सांगितले. तसेच राष्‍ट्रवादी शरद पवार गटानेच इथे कारवाई करावी, अशी मागणी केली होती, असा आरोपही त्‍यांनी केला. एकीकडे कारवाईसाठी पत्र द्यायचे आणि कारवाई झाल्‍यानंतर गरिबांना बेघर केले जातेय, असा आरोप करायचा हे सर्व दिशाभूल करण्याचा प्रकार विरोधकांचा आहे, असेही ते म्‍हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शरद पवारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, दुष्काळासंदर्भात केल्या १७ मागण्या

Premanand Maharaj Disciple Death : आश्रमाच्या छतावरून खाली पडले अन् मृत्यू; प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यूचं गूढ कायम

Competitive Exam Success Story: जिद्द, चिकाटी अन् मेहनतीला यशाची साथ; तीन माजी विद्यार्थ्यांची यशाला गवसणी, जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीचा महापराक्रम! तेंडुलकरनंतर वन डेत असा विक्रम नोंदवणारा पहिलाच; शुभमन गिलचेही शतक

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

SCROLL FOR NEXT