मुंबई

मुंबई-अहमदाबाद मार्ग खचला

CD

मुंबई-अहमदाबाद मार्ग खचला
अवजड वाहनांची चाके अडकली; दोन्ही मार्गांवरील वाहतूक ठप्प
विरार, ता. ९ (बातमीदार) : पहिल्याच पावसात मुंबई-अहमदाबाद महामार्ग खचला आहे. वसई हद्दीतील मालजीपाडा परिसरातील जे. के. टायर शो रूमजवळ सूर्या पाणीपुरवठा योजनेचे पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असल्याने हा महामार्ग खचला आहे. या मार्गावरील माती खचण्याची ही गेल्या १० दिवसातील दुसरी घटना आहे. खचलेल्या रस्त्यावर वाहनांचे टायर अडकल्याने महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. रविवारी (ता. ९) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे.
रस्त्यावर वाहने अडकल्याने महामार्ग पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. दहा दिवसांपूर्वीही घोडबंदरजवळ मिरा भाईंदरला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्याच्या पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असतानाच माती खचली होती. त्यामध्ये जेसीबीसह चालकही मातीत गाडला गेला होता. त्या प्रकरणाचे नेमके पुढे काय झाले, त्याची माहिती अजून समोर आली नाही.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सीमान्त काँक्रीटीकरण सुरू असल्याने अगोदरच प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच आता रस्ता खचल्याने त्याचाही त्रास सहन करावा लागत आहे. येत्या पावसाळ्यात महामार्गावरील सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण न झाल्याने रस्त्यावर खंड्ड्यांचे साम्राज्य दिसणार असल्याचे चित्र आतापासूनच स्पष्टपणे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT