मुंबई

मुंबईत दोन विमानांची टक्कर टळली

CD

सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. ९ : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन विमानांमधील टक्कर थोडक्यात टळल्याची घटना उघडकीस आली आहे. ज्या धावपट्टीवर इंडिगोचे विमान उतरत होते, त्याच धावपट्टीवरून एअर इंडियाच्या विमानाने मिनिटाआधी उड्डाण केले. या वेळी दोन्ही विमाने खूप जवळ आल्याने काहीवेळ हृदयाचा ठोका चुकला. शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) तातडीने चौकशी सुरू केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीवर शनिवारी पहाटे काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना धावपट्टी क्रमांक २७वर घडली. इंदूरहून आलेले इंडिगोचे विमान धावपट्टीवर उतरले, त्याच वेळी एअर इंडियाच्या विमानाने तिरुअनंतपूरमकडे उड्डाण केले. विमानांच्या लँडिंग आणि टेकऑफमध्ये खूप कमी वेळ मिळाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
इंडिगोने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इंदूर-मुंबई विमानाच्या वैमानिकाने ‘एटीसी’च्या सूचनांचे पालन केले. ८ जूनला इंदूरहून निघालेल्या इंडिगोच्या ‘६ ई ६०५३’ या विमानाला एटीसीने मुंबई विमानतळावर लँडिंग क्लीअरन्स दिले होते. ‘पायलट इन कमांड’ने अप्रोच आणि लँडिंग चालू ठेवले आणि ‘एटीसी’च्या सूचनांचे पालन केले. इंडिगोमध्ये प्रवाशांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वोच्च असून आम्ही प्रक्रियेनुसार या घटनेची माहिती दिली आहे.
----
‘एटीसी’चे अधिकारी, कर्मचारी निलंबित
नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) तातडीने कारवाई करून एअर ट्रॅफिक कंट्रोल विभागाचे (एटीसी) अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याच्या प्रकाराची चौकशी सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT