मुंबई

मुलाऐवजी सामान्य शिवसैनिकाला मंत्रिपद

CD

मुलाऐवजी सामान्य शिवसैनिकाला मंत्रिपद
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शब्दाला जागले

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ ः लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान कोल्हापूरमध्ये केलेल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, ‘अब राजा का बेटाही राजा नहीं बनेगा...’ असे म्हणाले होते. नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यात मुलगा श्रीकांत शिंदे यांच्याऐवजी प्रतापराव जाधव यांना केंद्रीय मंत्रिपदाची संधी देत, मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द खरा करून दाखवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
राजकारणात परिवारवादाची चर्चा नेहमीच होते. परिवारवादाला प्राधान्य देणार नाही, असे म्हणत आपल्या मुलाला आमदारकी, खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये मंत्री करण्याची अनेक उदाहरणे समोर आहेत. मात्र संधी असून आणि तिसऱ्यांदा खासदार होऊनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपदाची जबाबदारी दिली नाही, तर बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्यासारख्या सामान्य शिवसैनिकाला कॅबिनेट मंत्रिपदाचा मान दिला आहे. ‘मातोश्री’ला आव्हान देऊन वेगळे झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे कायम शिवसेना पक्ष ही कुणाची खासगी मालमत्ता नाही. शिवसेना हे माझे कुटुंब आहे. सर्व खासदार, आमदार, पदाधिकारी मला सारखेच आहेत, असे म्हणत आले आहेत. प्रतापराव जाधव यांचे नाव निश्चित करून त्यांनी केवळ बोलून नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून ते दाखवले आहे.
केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सरकार स्थापन होत आहे. राज्यात भाजपखालोखाल शिवसेने (शिंदे) गटाने सात जागा जिंकल्या आहेत. पक्षाला यश मिळवून देण्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत श्रीकांत शिंदे यांची रणनीती महत्त्वाची ठरली आहे. त्यामुळे पक्षात शिंदे यांचा शब्द अंतिम आहे; मात्र संधी देताना एकनाथ शिंदे यांनी प्रतापराव जाधव यांना संधी दिली. त्यावरून शिंदे यांनी आपल्या विरोधकांसोबत सर्व शिवसैनिकांना एक मोठा संदेश दिला असल्याचे राजकीय विश्लेषकांना वाटते. त्यामुळे आगामी काळात त्यांच्या प्रगल्भ राजकारणाच्या वाटचालीचे संकेतही त्यांनी दिले आहेत.
...
पक्षसंघटनेची जबाबदारी...
नरेंद्र मोदी यांचा शपथविधी निश्चित झाल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती; मात्र श्रीकांत शिंदे यांनी स्वतः पुढे येऊन मला मंत्रिपद नव्हे; तर पक्षसंघटनेची जबाबदारी घेण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते. खासदार नरेश म्हस्के यांच्यासह काही शिवसैनिकांनी श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद देण्याच्या भावना व्यक्त केल्या; मात्र तरीही एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्रिपदी सामान्य शिवसैनिकाला संधी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : अशोक खरातला भेटलेल्यांची HIV टेस्ट करा, नाहीतर...; विजय वडेट्टीवारांचा इशारा

Jalgaon Cotton Production : जळगावचा कापूस हंगाम संपुष्टात! 'सीसीआय'ची खरेदी बंद, निम्म्यावरच अडकले कापूस गाठींचे उत्पादन

Manchar Accident : मंचरजवळ एकलहरे येथे भीषण अपघात! पिंपरी-चिंचवडचे वास्तुविशारद आंबेगावे पती-पत्नी व सासूचा मृत्यू, दोन मुले गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : जळगावच्या पिंपळगाव हरेश्वर ते जरंडी रस्त्यासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषणाचा तिसरा दिवस

ग्राहक पैसे पूर्ण देतात, तर वापर न झालेला डेटा मध्यरात्रीच का रिसेट करता? टेलिकॉम कंपन्यांना राघव चड्ढांचा प्रश्न, ही डिजीटल लूट

SCROLL FOR NEXT