मुंबई

दिव्यांगांना पेन्शनची प्रतीक्षा

CD

भाईंदर, ता. १० (बातमीदार) : शहरात राहणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना महापालिकेकडून दरवर्षी वार्षिक पेन्शन दिली जाते. त्याचा दिव्यांगांना मोठा आधार असतो. दरवर्षी एप्रिलमध्ये पेन्शनचे वाटप सुरू होते, मात्र यावर्षी निवडणुकीची आचारसंहिता लांबल्याने दिव्यांग पेन्शनची प्रतीक्षा करत आहेत.
अर्थसंकल्पाच्या पाच टक्के रक्कम महापालिकेकडून दिव्यांगांसाठी राखीव ठेवली जाते. त्यातून दिव्यांगांना आवश्यक असलेले साहित्य, स्टॉल आदी सुविधांसोबत वार्षिक पेन्शनची सुविधाही दिली जाते. दिव्यांग किती प्रमाणात दिव्यांग आहेत, त्यानुसार त्यांना वार्षिक १० हजार, १३ हजार आणि १५ हजार रुपये पेन्शन दिली जाते. शहरात सुमारे दोन हजारांहून अधिक दिव्यांग आहेत. गेल्यावर्षी १,४०० दिव्यांगांना पेन्शन देण्यात आली होती. नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर एप्रिलपासून पेन्शनचे वाटप सुरू होणे अपेक्षित होते, मात्र लोकसभेची आचारसंहिता सुरू झाल्यामुळे हे वाटप लांबणीवर पडले. लोकसभा निवडणुकीचे निकाल घोषित झाल्यानंतर वाटप सुरू करायचे प्रशासनाने नक्की केले होते. त्यानुसार दिव्यांगांना पेन्शनसाठी १० जूनला अर्ज करण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे सोमवारपासून दिव्यांग महापालिका कार्यालयात यायला सुरुवात झाली, परंतु त्यांचे अर्ज स्वीकारता येणार नाहीत, असे उत्तर कर्मचाऱ्यांकडून देण्यात आले. त्यामुळे त्यांच्यात नाराजी निर्माण झाली.
लोकसभेची आचारसंहिता संपुष्टात येताच कोकण पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पेन्शन वाटप करणे प्रशासनाला अशक्य झाले आहे. आता पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर १० जुलैला अर्ज करण्यास दिव्यांगांना सांगण्यात आले, अशी माहिती महापालिकेच्या समाजविकास विभागाकडून माहिती देण्यात आली. निव्वळ निवडणूक आचारसंहितेमुळे दिव्यांग गेल्या तीन महिन्यांपासून पेन्शनपासून वंचित राहिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi speech Lok Sabha : होर्मुझमध्ये अडथळा कधीच...; लोकसभेत मोदींनी दिला स्पष्ट इशारा

IND vs AUS Test: भारत-ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेचा थरार, कांगारूंचा संघ वर्षभरात २० सामने खेळणार; पाहा वेळापत्रक

Gold Smuggling Case : 'या' अभिनेत्रीचं 100 कोटींचं 'गोल्ड कनेक्शन'; युगांडा ते दुबईपर्यंत पसरलेलं तस्करीचं जाळं उघड, ED च्या आरोपपत्रात धक्कादायक खुलासे

Latest Marathi News Live Update : सलग पाचव्या दिवशी SIT कडून गोपनीय ठिकाणी खरातची चौकशी सुरू

रेल्वेत टीसीच गैरवर्तन, प्रवाशाचं संतापून धक्कादायक कृत्य, मारहाण-धक्काबुक्की अन्...; Video Viral

SCROLL FOR NEXT