मुंबई

ठाण्यात तब्बल २४ अनधिकृत शाळा

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : बेकायदा शाळांचे पेव शहरी भागासह ग्रामीण भागापर्यंत पोहचले आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील माध्यमिक विभागाच्या २४ अनधिकृत शाळांची यादी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने जाहीर केली आहे. या अनधिकृत शाळा तत्काळ बंद करण्याचे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी दिले. अनधिकृत शाळांमध्ये आपल्या पाल्यांचा प्रवेश घेऊ नये, असे आवाहनही केले आहे.

ठाणे जिल्ह्यात २४ माध्यमिक शाळा अनधिकृतपणे सुरू होत्या. त्यापैकी २३ शाळा बंद केल्या असून सद्य:स्थितीत एक बेकायदा शाळा सुरू आहे. या शाळेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालकांनी त्यांच्या पाल्याचे प्रवेश घेताना अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नये, हाच अनधिकृत शाळांची यादी प्रकाशित करण्यामागे उद्देश आहे. पालकांनी माहिती घेऊनच पाल्याचे शाळेत प्रवेश निश्चित करावे, अशी माहिती दहितुले यांनी दिली. नवी मुंबईतील बेलापूर येथील अल मुनीहाज सेकंडरी हायस्कूल अनधिकृत माध्यमिक शाळा सुरू आहे, असे सांगण्यात आले.

बंद करण्यात आलेल्या शाळा
स्टार इंग्लिश हायस्कूल, दिवा
डिवाईन ग्रेस हायस्कूल, वज्रेश्वरी
आर.एन. इंग्लिश स्कूल, कोनगाव
फरान इंग्लिश मीडिअम स्कूल, गौरीपाडा, भिवंडी
आरंभ इंग्लिश स्कूल, दिवा पूर्व
न्यू गुरुकुल कॉन्व्हेंट स्कूल, श्लोकनगर, दिवा पूर्व
ग्रीन व्‍हॅली कॉन्व्हेंट स्कूल, दिवा आगासन
एस.एस. इंग्लिश स्कूल, दिवा
आर.एल.पी. हायस्कूल, मुंब्रादेवी कॉलनी, दिवा
आदर्श गुरुकुल स्कूल, दिवा
आदर्श गुरुकुल स्कूल (माध्यम मराठी), दिवा पूर्व
आदर्श गुरुकुल स्कूल (इंग्रजी माध्यम), दिवा पूर्व
एस.आर.पी. इंग्लिश स्कूल, वक्रतुंडनगर, दिवा
ओमसाई इंग्लिश स्कूल, दातिवली रोड, दिवा
श्री विद्याज्योती इंग्लिश स्कूल, मुंब्रादेवी कॉलनी, रोड
सिम्बॉयसिस स्कूल, सुंदरबन नगर, दिवा
केम्ब्रीज इंग्लिश स्कूल, मुंब्रादेवी कॉलनी रोड, मुंब्रा
पब्लिक इंग्लिश स्कूल, गणेशपाडा, दातिवली, दिवा
आर्य गुरुकुल इंग्लिश स्कूल, दातिवली रोड, दिवा
श्रीराम कृष्णा इंग्लिश स्कूल, दिवा-दातिवली रोड, दिवा
स्मार्ट एज्युकेशन इंग्लिश स्कूल, मुंब्रा
जे.डी. इंग्लिश स्कूल, फेस २, श्लोक नगर, मुंब्रा
भारत इंग्लिश स्कूल, सिद्धीविनायक नगर, दिवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईतील ट्रायडंट हॉटेल अडचणीत! बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा आदेश; बीएमसीचा अल्टिमेटम, प्रकरण काय?

'T20 वर्ल्ड कपमधून डच्चू मिळाला, आता शुभमन गिल... ', पुजाराचे IPL 2026 साठी गुजरात टायटन्सबाबत मोठं भाकीत

Baby Girl Born : गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कन्यारत्नाचे आगमन... आणि तेही रुग्णवाहिकेत! ; ‘१०८’ टीम ठरली देवदूत

Latest Marathi News Live Update : जळगावच्या होलसेल बाजारात इंडक्शन व इलेक्ट्रिक शेगड्यांचा तुटवडा

Broiler Chicken : बॉयलर जिवंत कोंबड्यांना उच्चांकी दर; चिकनच्या दरात मोठी वाढ

SCROLL FOR NEXT