मुंबई

पोटच्या मुलीला जमिनीवर आपटले

CD

नवी मुंबई, ता. १० (वार्ताहर) : पती-पत्नीच्या भांडणात पाच महिन्यांच्या मुलीला जीव गमवावा लागला आहे. बोकडविरा गावात ही घटना घडली असून रागाच्या भरात पोटच्या मुलीलाच जमिनीवर आपटणाऱ्या पित्याला उरण पोलिसांनी अटक केली आहे.
उरण भागात राहणारा खुशीराम भांडण काढून नेहमी पत्नीला मारहाण करत होता. शनिवारी रात्री दोघा पती-पत्नीमध्ये भांडण झाल्यानंतर खुशीरामने पत्नी अमृताला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पाच महिन्यांच्या मुलीला घेऊन अमृता बोकडविरा येथे वडिलांच्या घरी गेली. खुशीरामदेखील तिच्यापाठोपाठ सासरी गेला. त्याने मुलीला घेऊन जाणार असल्याचे सांगितले. मात्र, अमृताने मुलीला सकाळी घेऊन जाण्यास सांगितले. याच गोष्टीचा राग आल्याने खुशीरामने पाच महिन्यांच्या रुहीला जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत लहानग्या रुहीचे डोके जमिनीवर आपटल्याने तातडीने तिला उरणमधील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उरण पोलिसांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून जखमी रुहीला कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, रविवारी (ता. ९) सकाळी रुहीचा मृत्यू झाला.
-------------------------------------------------------
पाच महिन्यांची मुलगी रुहीला जमिनीवर आपटून दुखापत केल्याने खुशीराम ठाकूरवर कलम ३०८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू आहे. त्यामुळे कलम ३०४ (२) मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- राजेंद्र कोते, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, उरण पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'क्रिकेटशी मस्ती नाही...', आचरेकर सरांची तीन महत्त्वाची वाक्य कोणती? अमोल मुजुमदारांचा खुलासा; हरमनप्रीतला म्हटलं Best Captain

Pune Hinjawadi Metro Line 3 Inauguration : पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो धावणार; 'या' तारखेला होणार उद्घाटन, महिला चालवणार मेट्रो!

शाळेत घुसून दहावीच्या दोन मुलींवर करवतीने हल्ला; एकीची प्रकृती गंभीर, आरोपी अटकेत

फाइव्ह स्टार हॉटेलच्या स्विमींगपूलमध्ये उतरले, शॉक लागून २ परदेशी नागरिकांचा मृत्यू; वाचवायला गेलेले दोघे जखमी

Marathi News Live Updates : दिल्लीत १ नोव्हेंबरला काँग्रेस आणि भाजप आमनेसामने; रामलीला मैदानावर 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, तर भाजपचेही जोरदार शक्तीप्रदर्शन

SCROLL FOR NEXT