मुंबई

मुलाला वाचवताना पित्याचा मृत्यू

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १० : मलंगगड पट्ट्यात पहिल्याच पावसात घरावर दरड कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून दीड वर्षाच्या मुलाला वाचवताना पित्याचा मात्र जीव गेला आहे.
अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरातील घरांना पावसाळ्यात नेहमीच दरडीचे सावट असते. गेल्या वर्षीही पावसाळ्यात दरड कोसळून एका घराचे नुकसान झाले होते. त्यानंतर गावकऱ्यांनी दगड खाली येण्याचा धोका असलेल्या ठिकाणांवर ताडपत्री, प्लास्टिकचे कागद लावले होते. तरीदेखील पहिल्याच पावसात मलंगगड परिसरात दरड कोसळण्याची घटना घडली आहे. या घटनेत गुलाम सय्यद (वय ३०) यांचा मृत्यू झाला आहे. तर त्यांची पत्नी व मुलावर उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
--------------------------------------------
भूसुरुंग स्फोटांमुळे धोका
मलंगगड डोंगराच्या पाठीमागे काही दिवसांपूर्वी जेएनपीटी-वडोदरा महामार्गाच्या टनेलसाठी भूसुरुंग स्फोट करण्यात आले होते. त्याचे हादरे डोंगराला बसल्याने ही घटना घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तसेच अनधिकृत बांधकामे, वन विभागाच्या जागेवरील अतिक्रमणांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनाही जीव धोक्यात घालून वास्तव्य करावे लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT