मुंबई

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महावितरण सज्ज

CD

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महावितरण सज्ज
अधिकारी-तांत्रिक कर्मचाऱ्यांना कार्यालयात राहण्याचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : राज्यात मॉन्सूनची जोरदार सुरुवात झाली असून वादळी वाऱ्यामुळे वीज यंत्रणेत बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. त्याची दखल घेत महावितरणने फिल्डवरील आपल्या अधिकारी आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांना कार्यालयात आणि कामाच्या ठिकाणी राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील वीजग्राहकांना अखंडित वीजपुरवठा होण्यास मदत होणार आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यात महावितरणचे सुमारे २ कोटी ६० लाखांहून अधिक वीजग्राहक आहेत. पावसाळ्यात घरगुती वीज ग्राहकांबरोबरच शाळा, रुग्णालये, रेल्वे, पाणीपुरवठा विभागाला अखंडित वीजपुरवठा करणे गरजेचे आहे. पावसामुळे किंवा वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो तत्काळ पूर्ववत करण्यासाठी महावितरणने खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी रहावे, मोबाईल चोवीस तास सुरू ठेवावा, असे निर्देश दिले आहेत. एखाद्या अधिकारी-कर्मचाऱ्याने त्याचे उल्लंघन केल्यास सेवा शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे महावितरणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

पर्यायी मार्गाने वीज द्या
एखाद्या ठिकाणी वीज यंत्रणेत तांत्रिक बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित झाल्यास हा बिघाड दुरुस्त होईपर्यंत रुग्णालये, रेल्वे, पाणीपुरवठा आणि मोबाईल टॉवरचा वीजपुरवठा प्राधान्याने पूर्ववत करावा, त्यांना पर्यायी मार्गाने वीज जोडणी द्यावी, असेही निर्देश महावितरणकडून अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

एसएमएस, व्हॉट्सअपद्वारे माहिती
तांत्रिक बिघाडामुळे खंडित झालेला वीजपुरवठा कधी पूर्ववत होईल, बिघाड कशामुळे झाला आहे, याबाबतची माहिती वीज यंत्रणेच्या सिस्टीमद्वारे एसएमएसने ग्राहकांना दिली जावी, ग्रामीण भागात वीज वितरण फिडरनिहाय व्हॉट्सअप ग्रुप बनवून त्यावरही माहिती दिली जावी, असे महावितरणने आपल्या विभागीय कार्यालयांना बजावले आहे.

..
वीज हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो तत्काळ पूर्ववत करता यावा म्हणून वेगवेगळ्या टप्प्यांवर काम करण्याचे निर्देश संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिले आहेत. ग्राहकांना डोळ्यांसमोर ठेवून सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.
- भारत पवार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रासाठी पुढचे ७२ तास महत्वाचे, कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट

MP Cabinet:अग्निवीरांना मोठी भेट! पोलीस भरतीत 20% आरक्षण, भोपाळ गॅस ट्रॅजडीच्या जागेवर उभे राहणार भव्य स्मारक

Marathi Live Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये बुद्ध लेणी परिसरातील धबधबा पुन्हा प्रवाहित

Ayodhya Food: अयोध्या स्टाईल ब्रेकफास्ट करायचाय? राम मंदिर दर्शनानंतर या ठिकाणी फूड लव्हर्स नक्की जातात; कारण आहे 'महावीर टिक्की'

Pune Case : लोहगड खूनप्रकरणातील व्यावसायिक केतन अग्रवाल यांचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे उपचारादरम्यान निधन

SCROLL FOR NEXT