मुंबई

पश्चिम रेल्वेची मोठी कारवाई !

CD

एक्स्प्रेस गाडीतून दारूची तस्करी
दोघांना अटक; २६० बाटल्या जप्त

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : वांद्रे टर्मिनस-जम्मू तवी विवेक एक्स्प्रेसमधून दारूची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एकूण २६० दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले की, गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेल्या पाठपुराव्याच्या आधारे, पश्चिम रेल्वेच्या दक्षता पथकाने ८ जून २०२४ रोजी एक गोपनीय कारवाई केली. ट्रेन क्रमांक १९०२७ वांद्रे टर्मिनस-जम्मू तवी विवेक एक्स्प्रेसच्या स्लीपर कोच (एस-३)मधून दारू तस्करीत करणाऱ्या दोन प्रवाशांना अटक करण्यात आली. त्याची कसून चौकशी केल्यानंतर हे दोन्ही आरोपी सुरत येथील एका हॉटेल्समध्ये दारूच्या बाटल्या घेऊन जात असल्याचे उघड झाले. दोन्ही तस्करांकडून सुमारे ४६ हजार ५०० रुपये किमतीच्या एकूण २६० दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्यानंतर गुजरातच्या विद्यमान नियमांनुसार पुढील आवश्यक कायदेशीर कारवाईसाठी त्यांना दारूच्या बाटल्यांसह सुरतच्या सरकारी रेल्वे पोलिस (जीआरपी) यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari: मानाच्या गदेसाठी हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड लढणार; जय पाटील, सिकंदर शेख पराभूत

Success Story: मोलमजुरी करणाऱ्या आईचा मुलगा आयआयटीत; पारनेरच्या संतोष पागिरेंची गरुड झेप, लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले!

"फिटनेसच्या बाबतीत माझा रोल मॉडेल कुशल बद्रिके! देवदत्तने सांगितले ‘घबाडकुंड’ च्या सेटवरचे मजेशीर अनुभव

MI vs CSK: 'चेन्नई सुपर किंग्स नाही, तर मुंबई इंडियन्सच IPL मधील सर्वोत्तम संघ,कारण...' इरफान पठाणने स्पष्टच सांगितलं

"ते जुने गाऊन मी सिनेमात वापरले" भार्गवीने सांगितला वन रूम किचन सिनेमाचा खास किस्सा

SCROLL FOR NEXT