मुंबई

धारावीकरांचे पुनर्वसन मुलुंडमध्ये नको!

CD

धारावीकरांचे पुनर्वसन मुलुंडमध्ये नको!
प्रयास सामाजिक संस्थेची मागणी
घाटकोपर, ता. ११ (बातमीदार) ः धारावीकरांचे पुनर्वसन मुलुंडमध्ये न करण्याबाबत मुलुंडकरांनी विरोध कायम दर्शवला असून मुलुंडमधील कार्यरत प्रयास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ॲड. सागर देवरे यांनी ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले. धारावीकरांचे पुनर्वसन मुलुंडमध्ये करू नका आणि पीएपी प्रकल्प रद्द करा, अशी मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असून पीएपीबाबत पुनर्विचार करण्यात यावा, यासाठी मुंबई पालिका आयुक्तांना निवेदन देऊ, असे पाटील म्हणाले. मुलुंडकरांना विश्वासात न घेता परस्पर पुनर्वसन प्रकल्प सुरू ठेवल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा यावेळी खासदार संजय दिना पाटील यांनी दिला. दरम्यान, मिठागराची जागा धारावीकरांच्या पुनर्वसनासाठी देण्यात येऊ नये, यासाठी मिठागर विभाग व केंद्र सरकारकडे आक्षेप नोंदविण्यास येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी निवेदन देताना प्रयास संस्थेचे अध्यक्ष ॲड. सागर देवरे यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: दसऱ्यापूर्वी सोन्याचे भाव कोसळले! एकाच दिवसात तब्बल 25 हजारांनी घसरण; आजचा 10 ग्रॅमचा भाव पाहा

Solapur Edible Oil: खाद्यतेलाच्या दरात मोठी घट; सोलापूर बाजारात सूर्यफूल, सोयाबीन, पाम तेल प्रतिकिलो ५ रुपयांनी स्वस्त

Latest Marathi News Live Update : सोलापुरात चारा वाहतुकीवर निर्बंध! जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

IND vs AFG Asian Games: एकही चेंडू न खेळता भारत उपांत्य फेरीत; अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात नेमकं काय घडलं? नियम काय सांगतो?

छटपूजेनिमित्त परराज्यांसाठी ४१८ विशेष गाड्या, लोकल प्रवासी वाऱ्यावर; मध्य रेल्वेच्या दुटप्पीपणाविरोधात प्रवासी आक्रमक

SCROLL FOR NEXT