मुंबई

मॉर्निंग वॉकला जाताय, जपून!

CD

मॉर्निंग वॉकला जाताय, जपून!
अपघात टाळण्यासाठी रस्ते वाहतूक बदल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : मॉर्निंग वॉक, जॉगींग करताना लहान मोठे अपघात होतात. हे अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी रस्ते वाहतुकीत बदल केला आहे.
ऐरोली जंक्शन ते घाटकोपर, पंतनगरपर्यंत दक्षिण वाहिनीवरील सर्व्हिस रोडवर पहाटे ५ ते ७.३० वाजताच्या दरम्यान आसपासच्या परिसरातील लोक मॉर्निंग वॉक, जॉगींगसाठी मोठ्या संख्येने येत असतात. त्याच कालावधीमध्ये सेवा मार्गावरून वाहनांचीही वाहतूक होत असते. त्यामुळे सदर सेवा मार्गावर लहान मोठे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐरोली जंक्शन ते पंतनगरपर्यंतच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर दक्षिण वाहिनीवरील सर्व्हिस रोडवरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक नियमनाकरिता हे आदेश ३१ मे २०२५ पर्यंत लागू राहतील, असे वाहतूक विभागाने सांगितले.

रस्ता वाहतुकीसाठी बंद
ऐरोली जंक्शन ते घाटकोपर, पंतनगरपर्यंत पूर्व द्रुतगती महामार्गाचे दक्षिण वाहिनीवरील सर्व्हिस रोड हा पहाटे ५ ते ७.३० वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी वाहतुकीकरिता बंद राहील.
----
पर्यायी मार्ग
सदर कालावधीदरम्यान सर्व प्रकारची वाहने सर्व्हिस रोडऐवजी मुख्य मार्गावरून वाहतूक करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

Nagpur News : आई-बाबा मला माफ करा; तरुण अधिवक्‍त्याने गळफास घेऊन संपविले जीवन

Empress Garden : एम्प्रेस गार्डनच्या जागेवर न्यायालयीन बांधकामास विरोध; १३४ वर्षांचा ऐतिहासिक वारसा उद्ध्वस्त करण्याचा डाव

Gyanesh Kumar Impeachment : मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग चालवण्याची तयारी! ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ? विरोधी पक्ष संसदेत मांडणार प्रस्ताव!

IND vs WI, Live Streaming: भारत-वेस्ट इंडिज संघात ३ वनडे अन् ५ टी२० सामन्यांचा रोमांच! कधी, कुठे अन् किती वाजता पाहाणार मॅच?

SCROLL FOR NEXT