मुंबई

ठाणेकरांचे हालसत्र

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : गेल्या तीन दिवसांपासून रात्रीच्या वेळेला बरसत असलेल्या पावसाने मंगळवारी (ता. ११) दुपारच्या सुमारास अचानक दमदार हजेरी लावली. अवघ्या दोन तासांत ४८.५२ मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली. त्यातच दोन तासांत तब्बल आठ ठिकाणी पाणी साचल्याचे समोर आले. दरम्यान, या कालावधीत झाडे पडणे, पाणी साचणे अशा एकूण २३ तक्रारी ठाणे पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात नोंदविण्यात आल्या. सुदैवाने या घटनांमध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही.

माॅन्सूनला सुरुवात झाल्यापासून ठाण्यात रात्रीच्या सुमारास पाऊस पडत होता. त्यामुळे रात्री गारवा आणि दिवसभर अंगातून घामाच्या धारा येत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. अखेर मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. पहिल्या एक तासात ११.९४ मिमी पाऊस झाला, तर पुढील तासाभरात ३६.५८ मिमी पाऊस, असा दोन तासांत एकूण ४८.५२ मिमी पाऊस झाला. याच कालावधीत ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात एक आगीची, सहा झाडे कोसळल्याची, तर दोन ठिकाणी झाडांची फांदी पडल्याची, तर प्रत्येकी एक ठिकाणी झाड आणि फांदी धोकादायक झाल्याची, तसेच अन्य तीन तक्रारींसह आठ पाणी साचल्याची, तर एक होर्डिंग हलू लागल्याच्या तक्रारींचा समावेश आहे.

या आठ ठिकाणी पाणी साचले
जांभळी नाका येथील पेढ्या मारुतीजवळ, कॅडबरी जंक्शन येथील कोरम मॉलजवळ, ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील प्लॅटफॉर्म क्रमांक २ च्या बाजूला, मुंब्रा-कौसा येथील सोमय्या स्कूल व कॉलेज, पांचपाखाडी, रमाबाई आंबेडकर नगर येथील निपुण हॉस्पिटलजवळ, गणेश वाडी सिद्धेश्वर तलावाजवळ, मखमली तलाव येथील के. पी. गांधी चाळीजवळ, सुमित्रा सोसायटीच्या बाजूला आणि कोर्टनाका परिसरातील जुना आरटीओ ऑफिसजवळ या ठिकाणी पाणी साचले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचे ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढते स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Marathi News Live Updates : उद्धव ठाकरे कुटुंबीयांसोबत ‘मुंबईच्या राजा’च्या दर्शनाला

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

SCROLL FOR NEXT