मुंबई

पाण्याचा निचरा होत नसल्याने चाळकरी हैराण

CD

कल्याण, ता. ११ (वार्ताहर) : अटाळी परिसरात सखल भागात लोकवस्ती वाढली आहे. त्यातच मोठ्या प्रमाणात नवीन इमारती उभारल्याने पाण्याचा निचरा होण्यासाठी पर्यायी व्यवस्था कोलमडली आहे. परिसरातील चाळीत राहणारे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे पहिल्याच पावसात पाणी तुंबल्याने भुयारी गटाराची योजना कुठे गेली, असा सवाल येथे उपस्थित केला जात आहे. महापालिका प्रशासन व आपत्कालीन यंत्रणेने याबाबत त्वरित उपाययोजना न केल्यास तुंबलेल्या पाण्यात बसून अनोखे आंदोलन करण्याचा इशारा अटाळीतील चाळकऱ्यांनी दिला आहे.

आंबिवली रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मोतीराम पाटील नगरमधील रहिवाशांच्या घरात पावसाचे पाणी शिरते. यामुळे पावसाळ्यात येथील चाळकऱ्यांची मोठी दैनावस्था होते. मोठ्या गृहसंकुलांना रस्ता पालिकेने बनविला, मात्र स्थानक ते मोतीराम पाटील नगर रस्ता कोणी गायब केला, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. महापालिकेचे तत्कालीन महापौर दिवंगत राजेंद्र देवकर यांनी रस्त्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. काही काळानंतर रस्ता अर्धवट स्थितीत अडकून पडल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. याकडे प्रशासनाने सततचे दुर्लक्ष केल्याने रस्त्याचा प्रश्न पावसाळ्यात ऐरणीवर आला आहे. पावसाच्या पाण्याचा रस्त्यावरून निचरा होत नसल्याने तुंबलेल्या पाण्यातून पुन्हा रस्ता शोधत नागरिकांना पायपीट करावी लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Charges : २ हजारांवरील UPI व्यवहारांवर ०.४% शुल्क; १५ ऑक्टोबरपासून नवा नियम लागू

मनोज जरांगेंच्या भूमिकेवर मंत्रिमंडळात नाराजीचा सूर; बैठकीनंतर अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आलं अन्...; नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, उपचारास नकार

शाळेतल्या मित्राने PM मोदींची भेट घेतली, आता भाजप आमदाराने मित्राच्या मुंबईतील जमिनीवरचा ताबा सोडला

पाकिस्तानातील कराचीत गणपती बाप्पा मोरयाचा गजर! मराठी कुटुंबाकडून साजरा केला जातो गणेशोत्सव, आरतीचा VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT