मुंबई

पालिकेने धोरण केले कठोर

CD

पालिकेने धोरण केले कठोर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ ः पालिकेने होर्डिंगबाबतचे धोरण अतिशय कठोर केले आहे. मुंबईच्या हद्दीत कोणतेही होर्डिंग लावायचे असेल तर संबंधित प्राधिकरणाला मुंबई महापालिकेची परवानगी घ्यावीच लागेल, त्याशिवाय होर्डिंग लावता येणार नाही, असे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबईत विविध प्राधिकरणे आहेत. त्यात रेल्वे, म्हाडा, एमएमआरडीए, बीपीटी, विमानतळ आदी प्राधिकरणांचा समावेश आहे. मात्र, होर्डिंग लावताना ही प्राधिकरणे पालिकेला विचारात न घेता आपपल्या भूखंडावर अवाढव्य होर्डिंग लावत होते. मात्र, घाटकोपर दुर्घटनेनंतर पालिका आयुक्त गगराणी यांनी मुंबईतील सर्व प्राधिकरणांना होर्डिंगसाठी पालिकेची परवानगी घेणे बंधनकारक केले आहे.
मुंबई महापालिकेतील संबंधित अधिकाऱ्याच्या लेखी परवनगीशिवाय कोणत्याही जाहिरात संस्थेस जाहिरात फलक लावता येत नाही. शोरूम्स, कार्यालये, पेट्रोलपंप, सिनेमागृह, मॉल्स् इत्यादी व्यावसायिक ठिकाणांचा यामध्ये समावेश आहे. एखाद्या जाहिरात संस्थेने अधिकाऱ्याकडून परवानगी न घेता अनधिकृतरीत्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले तर ती संस्था मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८च्या कलम ४७१ अन्वये शिक्षेस पात्र ठरते.
जर पोलिस खात्यामार्फत विशेष आक्षेप नसेल किंवा सभोवतालच्या रहिवाशांना अडथळा होत नसेल, तसेच त्यांना उजेड आणि हवा येण्यास प्रतिबंध होत नसेल आणि मुंबई विकास नियंत्रण नियमावली १९९१ आणि या मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून असल्यास सर्वसाधारणपणे जाहिरात फलकास परवानगी नाकारता येत नाही. आयुक्तांनी ठरवून दिलेल्या शर्ती आणि शुल्क अधिदानासापेक्ष, साधारणतः एक महिन्यापेक्षा जास्त नाही. इतक्या कालावधीसाठी व्यावसायिक उद्दिष्टाकरिता जाहिरात प्रदर्शनासाठी तात्पुरती परवानगी देता येऊ शकते.

रेल्वेविरोधात पालिका न्यायालयात
मध्य रेल्वे हद्दीतील अनधिकृत होर्डिंग्ज काढा, यासाठी डिझास्टर ॲक्टअंतर्गत मध्य व पश्चिम रेल्वेला नोटीस बजावण्यात आली. मात्र, पालिकेच्या नोटिसीकडे दुर्लक्ष केले जात असून आता मध्य व पश्चिम रेल्वे विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले आहे.

मध्य रेल्वे हद्दीत - १७९ होर्डिंग
पश्चिम रेल्वे हद्दीत - १२७ होर्डिंग

काढलेले होर्डिंग
दादर टिळक पुलावरील - ८
घाटकोपर रेल्वे हद्दीतील - ६

सर्वाधिक होर्डिंग मध्य रेल्वे हद्दीत
मुलुंड- ४२, दादर, माटुंगा- २२, घाटकोपर- २०, इ वॉर्ड- १८, चेंबूर- १६, कुर्ला स्टेशन हद्दीत- १४
--
सर्वाधिक होर्डिंग पश्चिम रेल्वे हद्दीत
जी दक्षिण महालक्ष्मी, लोअर परळ- २८, आर सेंट्रल- २५, जी उत्तर दादर माटुंगा- २१, मालाड- १३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

IND vs WI: ऋतुराज गायकवाड, रिषभ पंत, जडेजाचे पुनरागमन होणार? वेस्ट इंडिजविरुद्धच्या ODI मालिकेसाठी का होणार संघात बदल

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Marathi News Live Updates : गंगा नदीत बुडणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांची वाचवण्यात बीएसएफला यश

SCROLL FOR NEXT