मुंबई

यंदा जुन्याच गणवेशात शाळेचा पहिला दिवस

CD

यंदा जुन्याच गणवेशात शाळेचा पहिला दिवस
विद्यार्थ्यांना मिळणार उशिरा वस्तू; १५ जूनपर्यंत होणार पुरवठा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : काही दिवसांत शाळा सुरू होणार असून बूट, वॉटर बॉटल, दफ्तर, वह्या, पुस्तके, गणवेश आदी २७ शालेय वस्तू यंदाच्या शैक्षणिक वर्षांमध्ये उशिराच मिळणार आहेत. शालेय वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी नुकतीच वर्क ऑर्डर दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जुन्या गणवेशातच हजेरी लावावी लागणार असू १५ जूनपर्यंत सगळ्या वस्तूंचा पुरवठा होणार असल्याची माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाने दिली आहे.

पालिकेच्या शाळा आता पुढील आठवड्यात सुरू होणार असून अद्यापही विद्यार्थ्यांच्या वस्तूंच्या खरेदीची प्रक्रियाच सुरू झालेली नाही. पालिकेच्या वतीने २०२४ ते २०२५ या दोन शैक्षणिक वर्षांसाठी या शालेय वस्तूंची खरेदी करण्यात येते; मात्र या खरेदीसाठी जूनच्या सुरुवातीला कार्यादेश देण्यात आले. त्यामुळे पुढील दोन महिन्यांचा कालावधी गृहीत धरल्यास महापालिकेच्या शाळांमधील मुलांना ऑगस्टपर्यंत या वस्तू मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. गणवेश, वह्या, बूट, मोजे, दप्तर, स्टेशनरी तसेच छत्र्या व रेनकोट आदी शैक्षणिक वस्तूंचा पुरवठा २००७ पासून मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना करण्यात येत आहे. मात्र एक ते दोन वर्षे वगळता प्रत्येक वर्षी शाळा सुरू झाल्यानंतर काही महिन्यांनी या वस्तूंचे वाटप होत आले आहे.
----
विद्यार्थ्यांची संख्या
इयत्ता पूर्वप्राथमिक ते इयत्ता २ री : २,५१,५१६
इयत्ता ३ री ते ७ वी : ३,८२,३८६
इयत्ता ८ वी १० वी : १,६६,६३८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT