मुंबई

चेंबूर गोवंडीत गुरुवारी पाणीबाणी

CD

चेंबूर गोवंडीत गुरुवारी पाणीबाणी
७५० मिमी व्यासाची झडप बसवणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : वाशीनाका येथे ७५० मि.मी. व्यासाची झडप बसवण्याचे काम पालिकेच्या जल विभागाद्वारे हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी गुरुवारी सकाळी ११ ते रात्री ११ वाजेपर्यंत हे काम होणार असल्याने चेंबूर, गोवंडी परिसरातील काही भागांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तरी या भागातील नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेच्या जल विभागाने केले आहे.

बी. डी. पाटील मार्ग, वाशीनाका येथील गवाणपाडा, एच. पी. सी. एल. रिफायनरी इत्यादी, शेवटच्या भागास पाणीपुरवठ्यामधील दाबामध्ये सुधारणा करण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. या अंतर्गत ७५० मि.मी. व्यासाचे जलद्वार बसविण्याचे काम गुरुवार १३ जून रोजी हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे गुरुवारी चेंबूर गोवंडी परिसरातील काही भागांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
---
या भागात पाणीपुरवठा बंद
एम पूर्व विभाग
(बीट क्रमांक १४७ ते १४८) लक्ष्मी वसाहत, राणे चाळ, नित्यानंद बाग, तोलाराम वसाहत, श्रीराम नगर, जे. जे. वाडी, शेठ हाइट्स, डोंगरे पार्क, टाटा वसाहत, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बी. पी. सी. एल.) वसाहत, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) वसाहत, गवाणपाडा, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एच. पी. सी. एल.) रिफायनरी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, टाटा पॉवर थर्मल प्लांट, भाभा अणु संशोधन केंद्र (बीएआरसी), वरुण बेवरेजेस
--
एम पश्चिम विभाग
(बीट क्रमांक १५४ ते १५५) माहुलगाव, आंबापाडा, जिजामाता नगर, वाशीनाका, मैसूर वसाहत, खाडी मशीन, रामकृष्ण चेंबूरकर (आर. सी.) मार्ग, शहाजी नगर, कलेक्टर वसाहत, सिंधी वसाहत, लालडोंगर, सुभाषचंद्र बोस नगर, नवजीवन सोसायटी, ओल्ड बराक, चेंबूर छावणी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT