मुंबई

विद्याविहार रेल्वे स्टेशनच्या पुलावर चेंगराचेंगरीची भीती

CD

घाटकोपर, ता. १५ (बातमीदार) : विद्याविहार रेल्वे स्टेशनवरील पूर्वेकडे असणाऱ्या अरुंद ब्रिजमुळे या ठिकाणी ऐन गर्दीच्या वेळी चेगराचेंगरी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या अरुंद पुलाची रुंदी वाढवावी, तसेच भविष्यात होणारे अपघात टाळावेत, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे आरोग्य सेनेचे नेते प्रकाश वाणी यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. विद्याविहार रेल्वे स्टेशनमध्ये टिळक नगर टर्मिनस आणि स्थानिक रेल्वे प्रवाशांची ये-जा मोठ्या प्रमाणात असते. सकाळी आणि संध्याकाळी चाकरमान्यांची या स्थानकाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. अरुंद पुलामुळे प्रवाशांची लोकल पकडण्यासाठी धावपळ सुरू असल्याने पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. पुलाची उंचीही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पूल चढताना तसेच उतरताना प्रवाशांना चांगलीच दमछाक करावी लागते. तसेच रेल्वेस्थानकाबाहेर पडणाऱ्या प्रवाशांना रिक्षा चालकांच्या मनमानी कारभारामुळे रिक्षा पकडण्यासाठी कसरत करावी लागते. याप्रकरणी रेल्वे प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी योग्य ते नियोजन करून प्रवाशांच्या गैरसोयी दूर कराव्यात, अशी मागणीही प्रकाश वाणी यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : आधी झोपेच्या गोळ्या अन् मग विजेचा करंट; पत्नीने प्रियकरासाठी पतीला हालहाल करुन मारले

Asia Junior Badminton: आशिया ज्युनियर मिश्र सांघिक स्पर्धा, अमिराती संघावर सहज मात, भारतीय बॅडमिंटन संघ उपांत्य फेरीत दाखल

Dr. Jayant Narlikar: वडिलांचे स्वप्न साकारणार; डॉ. लीलावती नारळीकर यांची भावना

पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत होते प्रेमसंबंध? त्रासाला कंटाळून तरुणानं गळफास घेऊन संपवलं जीवन; व्हिडिओ कॉल करुन काय बोलला?

Konkan Villages MSRDC : कोकणातील गावांचे गावपण जाणार, ५९३ गावांसाठी ‘एमएसआरडीसी’चे प्राधिकरण; एकनाथ शिंदेंवर ठाकरे सेना भडकली

SCROLL FOR NEXT