मुंबई

Kalyan Crime: हॉटेल चालकाला मारहाणप्रकरणी तिघांना अटक

Crime: सुरक्षारक्षक दीपक कालण, अविनाश केवणे व जितेंद्र केवणे या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

CD

Mumbai Crime : पार्सल घेऊन आलेल्या हॉटेल चालकाला सुरक्षा रक्षकांनी बेदम मारहाण केल्याची घटना खोणी पलावा परिसरात शनिवारी (ता. २२) रात्री घडली होती. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात हॉटेल मालकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला होता. यात सुरक्षारक्षक दीपक कालण, अविनाश केवणे व जितेंद्र केवणे या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

डोंबिवलीजवळील खोणी पलावा या सोसायटीत शनिवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली होती. अभिषेक जोशी यांचा या सोसायटीच्या जवळ थालीवाली ढाबा आहे. जेवणाचे पार्सल घेऊन ते पलावा येथे आले होते. या वेळी तेथील सुरक्षारक्षकांनी एन्ट्री करण्यास सांगितले.

अभिषेक यांनी आपल्या कर्मचाऱ्याला एन्ट्री करण्यास सांगितले असता सुरक्षारक्षक व त्यांच्यात वाद झाला. या वेळी सुरक्षा रक्षकांनी अभिषेक यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही मारहाण मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली होती. याप्रकरणी अभिषेक यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी याचा तपास करत सुरक्षारक्षक दीपक कालण याच्यासह अविनाश केवणे, जितेंद्र केवणे यांना अटक केली आहे.

“पालवा सिटी मॅनेजमेंट असोसिएशन (पीसीएमए) अशा वर्तनाला माफ करत नाही आणि भांडणाच्या घटनेत सामील असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचा आम्ही कामा वरुन काढून टाकले आहे. आमचा कार्यसंघ अधिका-यांशी सक्रियपणे सहकार्य करत आहे आणि त्यांच्या तपासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करत राहील.असे पलावा सिटी मॅनेजमेंट असोसिएशने कळवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : मानाचा चौथा तुळशीबाग गणपती बेलबाग चौकात दाखल, पाहा थेट प्रक्षेपण

Pune Metro : गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोचा मोठा निर्णय; रात्री 11 वाजेपर्यंत सलग 41 तास धावणार मेट्रो, प्रवाशांना दिलासा

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी बागेश्वर येथील मुसळधार पावसामुळे आपत्तीग्रस्त लोकांना भेट दिली

10,000 कोटींच्या मालकाची बायको, परंतु अभिनेत्री राहिली गटारीशेजारच्या झोपडीत, कारण ऐकून थक्क व्हाल

Chandra Grahan 2025: पितृपक्षाच्या पहिल्याच दिवशी लागणार चंद्रग्रहण, एक दिवस आधीच करा तुळशीशी संबंधित 'ही' कामे

SCROLL FOR NEXT