Navi Mumbai Crime: sakal
मुंबई

Navi Mumbai Crime: लग्नाच्या प्रलोभनाने तरुणीवर लैंगिक अत्याचार, महापे येथील घटना

Latest Crime News: मुंब्रा पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून हा गुन्हा तुर्भे एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग केला आहे.

CD

Mahape: महापे येथे कॉल सेंटर चालवणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या कार्यालयातील २० वर्षीय तरुणीला लग्नाच्या भूलथापा मारत वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उफेज शेख (वय ३३) असे या आरोपीचे नाव असून तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.


पीडित तरुणी मुंब्रा परिसरात राहण्यास असून आरोपी उफेज शेख हा शिळफाटा येथे राहण्यास आहे. पीडित तरुणी वर्षभरापूर्वी उफेज याच्या महापे येथील मिलेनियम बिझनेस पार्क येथील कॉल सेंटरमध्ये काम करत होती.

या कालावधीत आरोपीने पीडितेला लग्नाच्या भूलथापा मारून तिच्यासोबत ऑक्टोबर २०२३ मध्ये कॉल सेंटरमध्ये, पीडित तरुणीच्या घरात; तसेच स्वत:च्या घरात व इतर ठिकाणी पीडित तरुणीला नेत तिच्यावर अत्याचार केले. मात्र त्यानंतर आरोपीने या तरुणीसोबत लग्न करण्यास नकार दिला.

त्यामुळे पीडित तरुणीने गेल्या आठवड्यात मुंब्रा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार मुंब्रा पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून हा गुन्हा पुढील तपासासासाठी तुर्भे एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

Leopard Attack: श्वानाच्या धाडसाने बिबट्याला पळवले! पुरंदरात कालवडीवरचा हल्ला फसला, मध्यरात्री रंगला थरार..

Cultural Heritage: मुसळधार पावसाचा सांस्कृतिक वारशाला तडा! कवयित्री शांता शेळके यांच्या ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला

SCROLL FOR NEXT