मुंबई

वरोती बाजारपेठेत जीवघेणा खड्डा

CD

कासा, ता. ३ (बातमीदार) : डहाणू-नाशिक राज्य मार्गावर वरोती बाजारपेठेत मुख्य रस्त्यावर दीड फुटी खोल खड्डा पडला आहे. यामुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडत आहेत. सध्या पालघर जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू झाला असून रस्त्यावर पाणी साठत आहे. त्यात वरोती बाजारपेठेत मुख्य रस्त्यावरच मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यात वाहने आदळत असल्याने वाहनांचे नुकसान होत आहे. त्यामुळे खड्डा तत्काळ दुरुस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
पावसाची संततधार सुरू असल्याने त्या खड्ड्यात पाणी साठत आहे. परिणामी चालकांना तो धोकादायक खड्डा दिसत नसल्याने रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत. यामुळे वरोती येथील ग्रामस्थांनी कासा पोलिस ठाण्याजवळ असलेला जुना बॅरीकेट येथे आणून ठेवला आहे.
राज्य मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. यामुळे डहाणू-तलवाडा रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. या राज्य मार्गाच्या क्षमतेच्या कितीतरी पटीने अधिक वजनाच्या वाहनांची वाहतूक येथून होत असते; मात्र या वाहतुकीवर स्थानिक पोलिस प्रशासनदेखील दुर्लक्ष करत आहे. काही वर्षांपूर्वी याच रस्त्यांवर पावसाळ्यात महिला बाईक रायडरचा अपघाती मृत्यू झाला होता, त्यामुळे अपघात होऊ नयेत, यासाठी बांधकाम विभागाने येथील खड्ड्याची दुरुस्ती करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

डहाणू-नाशिक राज्य मार्गावर वरोती बाजारपेठेत खड्डा पडल्याचे कळले आहे. याबाबतीत ठेकेदाराला कळवले असून त्याची दुरुस्ती करण्यास सांगितले आहे.
-मनीष चकदरे. शाखा अभियंता, बांधकाम विभाग डहाणू.

मागील अनेक दिवसांपासून या रस्त्यावर खड्डा पडला आहे. यामुळे अनेक वाहनचालकांचे अपघात झाले आहेत. यामुळे मोठी हानी होऊ नये, यासाठी लवकरात लवकर याची दुरुस्ती करावी.
-जावेद मुल्ला, ग्रामस्थ, वरोती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT