मुंबई

आजार नियंत्रणासाठी जनावरांचे लसीकरण

CD

अलिबाग, ता. १ (बातमीदार) ः घटसर्प, फऱ्या, लंपीसारख्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत जनावरांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत एक लाख ८५ हजार ६०० जनावरांना लस देण्यात आली आहे. गाय, म्हैस, बैल आदी पाळीव जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे.
जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्‍त आहे. यादरम्‍यान जनावरांना फऱ्या, लंपी, घटसर्पसारखे आजार होण्याची भिती असते. ताप, येणे, अंगावर फोड येणे, घसा दुखणे अशा अनेक प्रकारचा त्रास होतो. कित्येक वेळा दुधाळ जनावरांच्या दुधाचे प्रमाण कमी होणे, गर्भपात होणे, अशक्‍तपणा येणे आदी समस्या निर्माण होतात. परिणामी पशुधन घटण्याचाही धोका असतो. पावसाळ्यात पशुधनाच्या सुरक्षेसाठी पशुसंवर्धन विभाग कामाला लागले आहे.
जिल्ह्यात घटसर्प आजारावर ४४ हजार लसीचा पुरवठा झाला असून ४२ हजार ७६५ लशी जनावरांना देण्यात आल्या आहेत. या आजारावरील ९८ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. फऱ्या व घटसर्प आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी १८ हजार लशी प्राप्त झाल्या असून १७ हजार ९९७ लशी देण्यात आल्या आहेत. या आजारावरील ९६ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. तसेच लंपीसाठी एक लाख ४१ हजार लशींपैकी एक लाख २४ हजार ८३८ जनावरांचे लसीकरण झाले आहे.

तालुक्यात १२ हजार जनावरांचे लसीकरण
अलिबाग तालुक्यात घटसर्प फऱ्या, आंत्रविषार व लंपी आजारावरील लसीकरणाचे काम तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजेश लाळगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. १२ हजार ३४० लसींचा पुरवठा अलिबाग तालुक्याला झाला असून १२ हजार ९० जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती तालुका पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT