मुंबई

छता मधून पाणी गळती

CD

चेंबूर स्थानकातील छताला गळती
चेंबूर, ता. १ (बातमीदार) ः चेंबूर रेल्वे स्थानकाच्या छताला गळती लागल्‍याने फलाटावर प्रवाशांना छत्री उघडून प्रवास करण्याची वेळ आली आहे. त्‍यामुळे रेल्‍वे प्रशासनाने छताची दुरुस्‍ती करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
हार्बर मार्गावरील चेंबूर रेल्वे स्थानक हे महत्त्वाचे स्थानक म्‍हणून ओळखले जाते. चेंबूर परिसरात लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्‍याचे दिवसभर प्रवाशांची गर्दी असते. चेंबूर स्‍थानकाचे पत्रे गंजलेले आहेत. काही ठिकाणी तुटलेले पत्रे दुरुस्त केले नसल्याने पावसाचे पाणी सरळ फलाटावर पडते. त्‍यामुळे प्रवाशांना चालणे कठीण झाले आहे.

इथेही समस्‍या
सध्या चेंबूर रेल्‍वे स्थानकासह कुर्ला, गोवंडी, मानखुर्द स्थानकातील छतांमधून पाण्याची गळती होत आहे. त्‍यामुळे रेल्‍वे प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन उपाययोजना कराव्यात, असे प्रवाशांनी सांगितले.

रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत आहे. पावसाळ्यापूर्वी रेल्वे स्थानकांतील शेडची पाहणी करून पाणी गळती थांबवली पाहिजे. काही रेल्वे स्थानकांत तर अर्धवट शेड आहेत. ती पूर्ण बांधली पाहिजे.
- ॲड. संतोष धोत्रे
अध्यक्ष, रेल्वे प्रवासी सुरक्षा संघ

पावसाळ्यात स्थानकातीळ छतातून पाणी गळती होते. लोकल पकडताना पूर्ण भिजावे लागते. रेल्‍वे प्रशासनाने या समस्‍येकडे त्वरित लक्ष घातले पाहिजे.
- ॲड. विशाखा साळवे, प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : कालाय तस्मै नम:! चाकणकरांनी पीडितांना न्याय न दिल्यानं परतफेडीची वेळ, खरातला राजकीय पाठबळ; रोहिणी खडसेंचा घणाघात

मला अटक केली तर तुमच्यावर कोप होईल; अटकेआधी अशोक खरातची पोलिसांना धमकी; नेमकं काय म्हणाला?

मुलं नाही पण पुतण्या चालवतोय भरत यांच्या अभिनयाचा वारसा ! 'या' मालिकेत करतो काम

Video Viral : तिलक वर्माने विचारला सूर्या दादाला प्रश्न; उत्तर मिळाले, IPL 2026 मध्ये मी कर्णधार नाही, तू हार्दिकला विचार...

१९ वर्षीय तरुणीला परराज्यात नेत २ लाखांत विकलं, फसवून लग्न केलं अन् २ महिने लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT