मुंबई

‘चलो बस्ती बदले'' अभियान

CD

‘चलो बस्ती बदले'' अभियान
मानखुर्द-लल्लुभाई कंपाऊंडमध्ये उपक्रम
धारावी, ता. १ (बातमीदार) : युवा संस्थेतर्फे ‘चलो बस्ती बदले’ या अभियानांतर्गत मानखुर्द-लल्लुभाई कंपाऊंडच्या स्टार टॉवरमध्ये एक महत्त्वपूर्ण उपक्रम रविवारी (ता. ३०) राबवण्यात आला. तरुण, लहान मुले, ज्‍येष्‍ठांनी एकत्र येत वृक्षाराेपणासह इतर कार्यक्रम घेण्यात आले.
खुल्या आणि असुरक्षित जागांना मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी योग्य आणि सुरक्षित जागेत रूपांतरित करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या प्रक्रियेत महिलांचा आणि मुलांचा सहभाग घेत पर्यावरण, जैवविविधता आणि सह-डिझाईन या सत्रांचे आयोजन करण्यात आले. सुमारे ५०० झाडे लावण्यात आली. झाडांबाबत माहिती देण्यासाठी वॉकचे आयोजन करण्यात आले होते.
स्टार टॉवरच्या सचिव सीता म्‍हणाल्‍या की, आधी ही जागा असुरक्षित होती. इथे नशा करणारे लोक येत होते. आता महिला आणि मुलेही या बागेत येऊ लागली आहेत. या बागेला वृंदावन गार्डन असे नाव देण्यात आले आहे. बागेची देखभाल करण्याची जबाबदारी सोसायटीकडून घेतली जाईल.
युवा संस्थेचे बाल अधिकार व हरित उपक्रमाचे समन्वयक प्रकाश भवरे म्‍हणाले की, पुनर्वसित वसाहतीमध्ये लोकांना घर मिळते, परंतु ते मूलभूत सुविधा आणि पर्यावरणीय न्यायापासून वंचित राहतात. या उपक्रमामुळे मानखुर्द-लल्लुभाई कंपाऊंडच्या पुनर्वसित वसाहतीमध्ये सकारात्मक बदल झाला आहे आणि समाजाच्या सर्व वर्गांसाठी एक सुरक्षित जागा आणि हरित पर्यावरणाची निर्मिती झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI MDR Charge: UPI पेमेंटवर चार्ज लागू झाला तरी हे 6 UPI व्यवहार फ्री! एक रुपयाही चार्ज नाही; जाणून घ्या कोणते

IND vs PAK Asian Games : श्रेयस अय्यरचा संघ आशियाई स्पर्धेत पाकिस्तानला भिडणार? जाणून घ्या हा महामुकाबला केव्हा होणार

iPhone 18 Pro साठी पहाटेपासून ग्राहकांच्या लांब रांगा; कुठे मिळतो? किती EMI भरावा लागणार? जाणून घ्या

Marathi News Live Updates : शिरूरच्या आंबेडकर नगरमध्ये गोळीबार; दुचाकीवरून जात असलेल्या तरुणावर झाडल्या गोळ्या

Goat Farming Subsidy: शेळीपालनासाठी ६.८४ लाखांचे अनुदान; १०० शेळ्या, ५ बोकडांचा फार्म उभारण्याची संधी, कसा करायचा अर्ज?

SCROLL FOR NEXT