मुंबई

बदलत्या ठाण्याचे कोट्यवधी रुपये खड्ड्यांत

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २ : मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या उपक्रमांतर्गत पावसाळ्यात ठाणेकरांना खड्डेमुक्त प्रवास करता यावा, यासाठी शेकडो कोटी रुपये खर्च करून रस्त्यांची कामे करण्यात आली. त्यामुळे काही अंशी येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. असे असले तरी उड्डाणपुलांवर पडलेले खड्डे वाहनचालकांची डोकेदुखी ठरू लागली आहे. त्यात हे खड्डे चुकवताना अपघाताला निमंत्रण मिळण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
मागील वर्षाप्रमाणे यंदाही पावसाळा आणि खड्डे हे समीकरण जुळून आले आहे. यावर्षी अद्याप हवा तसा पाऊस पडला नाही, तरी ठाणे शहरातून जाणाऱ्या विविध प्राधिकरणाच्या उड्डाणपुलांवर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. ठाण्यातील कापुरबावडी, माजिवडा उड्डाणपुलांवर खड्डे पडल्याचे दिसून आले होते. त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने येथील खड्डे बुजवले. मात्र, त्यावर तात्पुरता दिलेला मुलामा आता काहीच उपयोगी ठरत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या पुलांवर पुन्हा खड्डेच खड्डे असे चित्र दिसत आहे. त्यातही विवियानाकडून घोडबंदरकडे जाताना माजिवडा उड्डाणुपलावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचत असल्याने दुचाकीस्वारांना या खड्ड्यांचा अंदाजच येत नाही. परिणामी, गाडी आदळून आणि दुचाकीचालकाचा तोल जाऊन दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे.

खडीवरून दुचाकीस्वारांची घसरण
एमएसआरडीसीच्या ताब्यात असलेल्या नितीन कंपनी उड्डाणपुलावरही खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यावर सिमेंटचे खडी मिश्रीत मटेरीयल टाकले जात आहे. परंतु तेदेखील वाहून जात आहे. त्यामुळे या खडीवरून दुचाकीस्वार घसरत असल्याचे चित्र आहे.

वाहतुकीचा वेग मंदावला
तीनहात नाक्यावरील खालील बाजूच्या रस्त्यावरही खड्डे पडू लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे महापालिका हद्दीतील रस्त्यांवर नाही; परंतु इतर प्राधिकरणांच्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडत आहेत. मुंबई-नाशिक महामार्गही खड्ड्यांमध्ये गेल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Exam Mass Copy : बारावी निकालादरम्यान मोठी खळबळ! 250 हून अधिक विद्यार्थ्यांवर कारवाई; गोंदिया-वर्ध्यातील 243 विद्यार्थी अनुत्तीर्ण, बोर्डाचा कठोर निर्णय

डॉक्टर 'डिलिव्हरी जिहाद' करतात, हिंदू महिलांचं सिझेरियन कसं? कालीचरण महाराजांचं पुन्हा वादग्रस्त विधान

शिवकालिन इतिसाहातील एक सुवर्ण पान! भव्य सेट, दमदार संवाद आणि अ‍ॅक्शन सीन; कसा आहे 'राजा शिवाजी'?

Crime: धक्कादायक! ८ मुलांची आई ५ मुलं असलेल्या जावयासोबत पळाली, पती म्हणतो- १२ वर्षाआधी पण त्यांनी...

अन्न सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, गुणवत्तेकडे लक्ष देण्याचे आवाहन; तज्ज्ञांचा नागरिकांना सावधगिरीचा इशारा

SCROLL FOR NEXT