मुंबई

विक्रमगडवर प्राध्यापकांचे लाक्षणिक उपोषण

CD

विक्रमगडवर प्राध्यापकांचे लाक्षणिक उपोषण

विक्रमगड, ता. २ (बातमीदार) : संजीवनी ग्रामीण वैद्यकीय व सामाजिक सहायता प्रतिष्ठान संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ओंदे-विक्रमगड येथे प्राध्यापकांचे लाक्षणिक उपोषण सुरू आहे. या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षांपासून प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांवर संस्थेकडून मानसिक छळ, आर्थिक शोषण आणि दहशत पसरवून चुकीची कामे करून घेतली जात आहेत, तसेच विद्यापीठाच्या नियमांनुसार परीक्षेचे मानधन कित्येक वर्षे न देता त्यामध्ये अपहार करण्याचा प्रकारही घडला आहे. या सर्व प्रकाराविरोधात सोमवारी (ता. १) प्राध्यापक संघटनेने लाक्षणिक उपोषण केले.
महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी आदिवासी आहेत, मात्र येथील भ्रष्टाचारामुळे त्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत असल्याचा आरोपही प्राध्यापक संघटनेकडून करण्यात आला आहे. या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय पवार, उपाध्यक्ष डॉ. शशिकांत माघाडे, सचिव डॉ. निर्मला पवार, डॉ. विजय कांबळे, डॉ. संदेश डोंगरे, डॉ. काळूसे यांनी आंदोलनाला भेट दिली. या आंदोलनाला जिल्ह्यातील सामाजिक संस्था, राजकीय पदाधिकारी, शिक्षणप्रेमी आणि नागरिकांनी भेट देऊन या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे.
MUM24E57242

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahmedabad Viral Video : “अरे जल्दी कर, सुबह पनवेल निकलना है” म्हणताच प्राध्यापक भडकले; विद्यार्थ्याची स्टेजवरच धरली गचांडी, VIDEO VIRAL

IND A vs AUS A: भारताच्या विजयात 'मुंबई'कर चमकले! ऑस्ट्रेलियाला पाणी पाजले, मालिकेत १-० ने आघाडी

ती बाहेर मोठी सेलिब्रिटी असेल पण घरी... अपूर्वा नेमळेकरबद्दल काय म्हणाले सासरे; दीर म्हणतात- तिने सहा महिने...

Lalbaugcha Raja: पालखी निघाली राजाची...! लालबागच्या राजाची निरोपाची आरती; डोळे पाणावणारा क्षण VIDEO

Maharashtra Ganesh Visarjan Live: मनाचा तिसरा गुरुजी तालीम मिरवणुकीत ढोल ताशांची अफलातून जुगलबंदी

SCROLL FOR NEXT