मुंबई

‘अँटी फ्रॉड ॲप वॉररूम’ला जोडणार

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : महात्मा जोतिराव फुले जनस्वास्थ्य योजनेशी संबंधित रुग्णालयांमध्ये फसवणूक होत असल्याची लक्षवेधी अपक्ष सदस्य सत्यजित तांबे यांनी विधिमंडळात मांडली होती. त्यावर राज्याच्या आरोग्य विभागाकडून रुग्ण कक्षात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह आरोग्य विभागाच्या वॉर रूमलाही ‘अँटी फ्रॉड ॲप’ जोडण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे.
अपक्ष सदस्य सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत लक्षवेधी प्रस्तावाअंतर्गत एमपीजेवायए योजनेबाबत अनेक मुद्दे उपस्थित केले होते. यातील योजनेशी संबंधित अनेक रुग्णालयांनी बनावट रुग्ण दाखवून योजनेचा लाभ घेतल्याची तक्रार होती. यासोबतच ही योजना शहरातील मोठमोठ्या रुग्णालयात लागू करण्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी एमपीजेवायए योजना राज्यातील प्रत्येक शहरातील मोठमोठ्या रुग्णालयांमध्ये राबवण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच प्रत्येक रुग्णालयात शिष्टमंडळ जाऊन योजनेचे गांभीर्य ओळखून रुग्णालयात राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
-----------------------------------------
दंत उपचाराचा योजनेत समावेश
या योजनेंतर्गत दातांवरही उपचार करता येणार आहेत. मंत्री सावंत यांनी या उपचाराचा योजनेच्या यादीत समावेश करण्याची घोषणा केली आहे. अपक्ष सदस्य सत्यजित तांबे यांच्या मागणीवरून ही घोषणा करण्यात आली आहे. तसेच योजनेंतर्गत १,३५६ आजारांची उपचार यादी तयार करण्यात आली असून त्यात दंत उपचारांचाही समावेश करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Price: सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी; युद्धस्थिती शमल्याचा परिणाम

Dhurandhar Movie Controversy: बॉक्स ऑफिसवर गाजणारा ‘धुरंधर’ आता कायद्याच्या रडारवर; बंदी घालण्याची मागणी

Latest Marathi News Live Update : हरीश राणा यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी 'ग्रीन पार्क स्मशानभूमीत आणले

Accident In Kagal : नॅशनल हायवे बनला मृत्यूचा सापळा, रेल्वे भरतीची परीक्षा देऊन घरी येताना विवाहितेचा भीषण अपघात; दोन्ही मुले झाली आईविना पोरकी

India Sports Economy: भारतीय क्रीडा अर्थव्यवस्था २०० कोटी डॉलर पार; २०२५ वर्षामध्ये १३.४% वाढ; क्रिकेटचा वाटा सर्वाधिक ८९ टक्क्यांचा

SCROLL FOR NEXT