मुंबई

मलेरिया रुग्णांची फोनवरुन घेणार माहिती

CD

मलेरिया रुग्णांची फोनवरून घेणार माहिती
वॉर्डस्तरावर रुग्णांवर लक्ष ठेवणार, पालिकेची मलेरिया सर्व्हिलन्स टीम तयार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मुंबईत माॅन्सून दाखल झाला आहे. पावसाळ्यात मलेरिया, डेंगीचे रुग्णही वाढू लागले आहेत. रुग्‍णांची संख्या रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने विविध उपाययोजना आखल्या आहेत. यासाठी प्रभागस्तरावर ‘मलेरिया सर्व्हिलन्स टीम’ तयार केली आहे. ही टीम मलेरिया रुग्णांच्या आरोग्यासाठी केवळ फोनवरूनच नव्हे तर, त्यांच्या घरी जाऊन निरीक्षण करेल. ते नियमितपणे औषधे घेत आहेत की नाही, हेदेखील जाणून घेईल.
पावसाळ्यात मुंबईकरांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी मुंबई महापालिकेने दोन महिने आधीच तयारी सुरू केली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले की, पावसाळ्यातील आजारांना विशेषत: डेंगी, मलेरियाचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाने चोख व्यवस्था केली आहे. मलेरिया पॉझिटिव्ह रुग्‍ण आढळल्‍यानंतर १४ दिवसांचा उपचार कोर्स पूर्ण करावा लागतो. मात्र, खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण अनेकदा कोर्स पूर्ण करत नाहीत. त्यामुळे अशा रुग्णांवर वॉर्डस्तरावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. रुग्‍ण नियमित औषध घेतात की नाही, हे या फोनद्वारे टीमला जाणून घेता येईल. आठवड्याच्या प्रत्येक तिसऱ्या दिवशी ही टीम रुग्णांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी करेल.

मलेरियाचा कोर्स पूर्ण न केल्यामुळे रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. रुग्णाचे रक्त शोषल्यानंतर डास दुसऱ्या व्यक्तीला दंश करत असेल तर त्यालादेखील संसर्ग होऊ शकतो.
-डॉ. दक्षा शहा, कार्यकारी अधिकारी, महापालिका आरोग्य विभाग

या भागांवरही लक्ष
पावसाळ्यात मलेरिया आणि डेंगीचा सामना करण्यासाठी सूक्ष्म आराखडा तयार करण्यात आला आहे. ज्या भागात मलेरिया आणि डेंगीचे जास्त रुग्ण आढळून येत आहेत, त्या ठिकाणी आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे.

मुंबईत मलेरियाचे २,४८४ रुग्ण
राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते २१ जूनपर्यंत मुंबईत मलेरियाचे दोन हजार ४८४ रुग्ण आढळले आहेत. तर गेल्यावर्षी याच कालावधीत मुंबईत एक हजार ८०८ रुग्ण आढळले होते. या आकड्यांचे मूल्यांकन केल्यास गेल्या वर्षी मुंबईत दररोज २५ मलेरियाचे रुग्ण आढळले होते, जे २०२४ मध्ये ३५ पर्यंत वाढले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT