मुंबई

नेरळ पोलिसांकडून दोन गुन्हे उघड

CD

नेरळ, ता. २ (बातमीदार) ः दोन वेगवेगळ्या गुन्ह्याचा तपास करत त्यातील चार आरोपींना मुद्देमालासह पकडण्यात नेरळ पोलिसांना यश आले आहे.
मौजे माले गावात राहणारे गोपाळ लक्ष्मण वेहेले यांनी त्यांच्या घरामागे मोकळ्या जागेत चरण्यासाठी सोडलेले ३ बैल २६ मे रोजी चोरट्यांनी पळवले. याप्रकरणी नेरळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्‍यानुसार नेरळ पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी तपास पथक नियुक्त केले. पथकाने तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपींनी ३ गुरे भरून नेण्याकरिता स्कॉर्पिओ गाडी वापरल्‍याचे माहिती समोर आली. त्‍यानंतर साहिल नावेद शेख, इम्तियाज महम्मद इलियास शेख, अकबर जाबाज शेख (सर्व रा. रेतीबंदर रोड, कल्‍याण) यांना वाजता अटक केली. तसेच गुन्हा करण्याकरीता वापरलेली कारही हस्तगत केली.
दुसऱ्या एका प्रकारणात नेरळ निर्माण नगरी सोसायटीच्या मोकळ्या जागेतून चिराग रामचंद्र धुळे यांची दुचाकी चोरी झाली होती. नेरळ पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने सूत्रांच्या मदतीने गुन्हा उघडकीस आणला. गुन्ह्यात आरोपी सचिन सुनील सोनावणे (३२, कुलाबा) याला अटक करण्यात आली. आरोपीने नेरळमधून चोरलेली तसेच पनवेल, कामोठे, नेरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेल्या अशा एकूण ५ दुचाकी हस्तगत करण्यात आल्‍या आहेत. आरोपी सध्या पोलिस कोठडीत असून नेरळ पोलिस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर अधीक्षक अतुल झेंडे, कर्जतचे उपविभागीय अधिकारी डी.डी. टेळे यांचे मार्गदर्शनाखाली नेरळ पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक निरीक्षक शिवाजी ढवळे, उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर, समीर लोंढे, सहायक फौजदार श्रीरंग किसवे, हवालदार प्रवीण लोखंडे आदींनी महत्त्वाची कामगिरी बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT