मुंबई

ग्रामीण भागात भात लावणीला सुरूवात

CD

किन्हवली, ता.२ (बातमीदार) : जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून नद्या, तलाव, विहिरींची पाणीपातळी वाढली आहे. ठिकठिकाणी सखल भागातही पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली; दमदार पाऊस बरसल्याने तालुक्यात भातलावणीच्या कामांना वेग आला असून बळीराजा सुखावला आहे. यंदा बी-बियाणे व खते शेतकरीवर्गाला मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली असून पावसाच्या संततधारेने शेतीकामांना वेग आला आहे. आदिवासी शेतकऱ्यांनी पूर्वापार चालत आलेल्या ग्रामीण भागात रितीरिवाजाप्रमाणे शेतावरील देवीदेवतांना कोळीभाजी देत भातलावणीच्या कामांना सुरुवात केली.

ग्रामीण भागात भातलावणीच्या कामाला सुरुवात करण्याआधी शेताच्या बांधावर देवीदेवता, वनदेवी आदींना पुरणपोळी, शिरा, गूळ भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. ग्रामीण भागात आजही या रूढी-परंपरा जोपासल्या जात आहेत. शेती मशागत हंगामात कोणतेही अरिष्ट येऊ नये, यासाठी देवतांना साकडे घालणे, हा यामागचा उद्देश असल्याचे ग्रामस्थ सांगतात. शहापूर तालुक्यात एकूण १४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर भाताचे उत्पन्न घेतले जाते. विविध भाताच्या वाणाची लागवड येथे केली जाते.

गेल्या आठवडाभरापासून भातलावणीसाठी योग्य पाऊस पडत असल्याने प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाने सोमवारपासून भातलावणीला सुरुवात केली आहे. ठाणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांत अनेक रुढी-परंपरा प्रचलित आहेत. भातलावणीच्या कामाला सुरुवात करण्याआधी शेतकरी ग्रामदेवता, शेतबांधावरचे देवीदेवता, वनदेवी यांना साकडे घालतात.

शेती हंगामात कोणताही कोप नको, शेतात काम करणारी माणसे, रानात चरणारी गुरे-ढोरे आदींवर कोणतेही नैसर्गिक अरिष्ट येऊ नये, सर्पदंश, विंचूदंश किंवा कोणतीही दुखापत, जखम होऊ नये, पाऊस समाधानकारक व्हावा यासाठी पूर्वजांनी घालून दिलेल्या रुढी-परंपरांचे जतन केले जाते. सध्या यांत्रिकीकरणामुळे आधुनिक शेतीकडे ओढा असला तरी अशा परंपरा जोपासताना शेतकरी कुठेही कमी पडत नाही.

भातलावणीआधी देवीदेवतांना नैवेद्य दाखविणे, पूजन करणे अशा रूढी-परंपरा जोपासल्या जातात. यातून पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.
- चंद्रकांत देसले, शेतकरी, चोंढे-डोळखांब

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT