मुंबई

अन् तिला बावडी सापडलीच नाही

CD

राजीव डाके ; सकाळ वृत्तसेवा

ठाणे शहर, ता. २ : सहा महिन्यांपासून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वृद्धेचा अखेर मृत्यू झाला आहे. सहा महिन्यांपूर्वी काही अज्ञातांनी तिला रुग्णालयाच्या आवारात बेवारसपणे सोडून दिले होते. तिची आरोग्यस्थिती अत्यंत गंभीर असल्याने तेथील सुरक्षा रक्षकांनी पोलिसांच्या मदतीने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना सतत ती ''माझे घर बावडीजवळ आहे'' असे पोलिसांना सांगत होती; मात्र ती बावडी सापडण्याआधीच उपचारादरम्यान तिचा अखेर मृत्यू झाला.

कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या आवारात सुरक्षा रक्षकांना मागील वर्षी ३ ऑक्टोबरला ७२ वर्षीय वृद्ध महिला आढळून आली होती. कोणीतरी तिला अत्यंत गंभीर अवस्थेत येथे सोडून गेले होते. तिची अवस्था पाहता सुरक्षा रक्षकांनी तिला पोलिसांच्या मदतीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी अनेकदा ती कुठून आली, याबाबत तिच्याकडे विचारणा केली; मात्र प्रत्येक वेळी ती तिचे नाव मारीगा मार्शल असे असून बावडी (विहीर)जवळ तिचे घर आहे, असे सांगत असे. परंतु तिला पूर्ण पत्ता सांगता येत नसल्यामुळे पोलिसांना तिचे घर शोधून काढणे कठीण झाले होते. अशातच सहा महिन्यांचा कालावधी उलटला. उपचार सुरू असतानाच यंदा ३ एप्रिल रोजी तिचा मृत्यू झाला. तिच्या घरच्यांचा पत्ता आढळून न आल्यामुळे रुग्णालय प्रशासनाने तिला बेवारस म्हणून शवागृहात ठेवले. शवागृहात ठेवून अडीच महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही तिच्यासाठी कोणीही नातेवाईक आले नाहीत. त्यामुळे अखेर बेवारस म्हणून तिचा अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. पोलिसांनी ही जबाबदारी सॅनरोज फाऊंडेशन संस्थेला दिली. ही संस्था बेवारस मृतदेहांचे अंत्यविधी करते. त्यानंतर या संस्थेने अपना घर चॅरिटेबल ट्रस्टच्या मदतीने २६ जून रोजी मुलुंड येथील महापालिकेच्या ख्रिश्चन दफनभूमीत मारिगावर ख्रिश्चन संस्कारानुसार अंत्यसंस्कार केले.

बेवारस मृतांवर पोलिसांमार्फत प्रत्येकाच्या धर्मानुसार अंत्यसंस्कार केले जातात. काही संस्था असे अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार घेतात. मारिगा मार्शल हिच्यावर सॅनरोज फाऊंडेशनच्या पुढाकारातून ख्रिश्चन परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. नियमानुसार तिच्या वारसाची वाट पाहण्यात आली होती.
- अशोक उतेकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कळवा पोलीस ठाणे.

कळवा रुग्णालयात अंत्यसंस्कारासाठी बेवारस मृतदेह आहे, तिच्यावर अंत्यसंस्कार करणार का? पोलिसांनी अशी विचारणा करताच मी लगेच त्यास होकार दिला. संस्थेच्या खर्चाने मारिगा मार्शल या वृद्ध महिलेवर अंत्यसंस्कार केले. गरीब बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी सॅनरोज फाऊंडेशन नावाची संस्था सुरू केली आहे.
- जोस्लिन सोरेस, अध्यक्ष, सॅनरोज फाऊंडेशन, ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘ज्ञानेश कुमार यांचा तात्काळ राजीनामा घ्या’; SIR वरून अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप

Asian Games 2026 : अफगाणिस्तान, मलेशिया यांचा विजय; टीम इंडियाला उपांत्यपूर्व फेरीत कोण भिडणार? जाणून घ्या समीकरण

पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी; दोषींवर गुन्हा दाखल होईपर्यंत भिंगार बंदची हाक

Latest Marathi News Live Update : निटचा निकाल जाहीर

Mirkarwada Jetty Cleanup : विनावापर नौकांच्या केबिन हटवल्या मिरकरवाड्यात धडक कारवाई; जेटींनी घेतला मोकळा श्वास

SCROLL FOR NEXT