मुंबई

म्हाडाचा व्यावसायिक गाळा १४ कोटींचा

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : म्हाडाच्या मुंबई शहर आणि उपनगरातील निवासी इमारतीतील १७३ गाळ्यांची विक्री होणार आहे. या लिलावात गोरेगाव पूर्वेकडील बीबीसारनगरमधील एका गाळ्यांसाठी तब्बल १३ कोटी ९२ लाख ९९ हजार मोजण्यात आल्याने ई-लिलावातून म्हाडा मालामाल झाली आहे.
म्हाडाला निवासी इमारती उभारताना महापालिकेच्या व्यावसायिक आरक्षणानुसारही बिगर निवासी गाळ्यांची उभारणी करावी लागते. त्यानुसार तयार असलेल्या १७३ गाळ्यांच्या ई-लिलावासाठी म्हाडाने मार्चमध्ये जाहिरात काढली होती. जवळपास १,२२५ अर्ज आले होते. त्यापैकी ६०४ लोकांनी अनामत रक्कम भरताना प्रत्यक्ष ई-लिलावामध्ये सहभाग घेतला होता. विक्रीसाठी काढलेल्या १७३ गाळ्यांची किमान किंमत ९० कोटी निश्चित केली होती. त्यापैकी १०९ दुकानांना बोली लागली असून म्हाडाला १७० कोटी मिळणार आहेत. त्यामुळे मूळ किमतीच्या जवळपास दुप्पट रक्कम म्हाडाच्या तिजोरीत जमा होणार आहे.
-----------
६१ गाळ्यांना प्रतिसादच नाही
म्हाडाने विक्रीसाठी काढलेल्या काही गाळ्यांना मोठी किंमत मिळाली असली तरी जवळपास ६१ गाळ्यांना कोणीच बोली लावली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या गाळ्यांचा भविष्यात काढल्या जाणाऱ्या लॉटरीत समावेश केला जाणार आहे.
- स्वदेशी मिल - ३
- गव्हाणपाडा मुलुंड - १
- तुंगा गाव पवई - २
- चारकोप - १०
- मालवणी - ३९
- बीबीसारनगर - ५
- जोगेश्वरी -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT