मुंबई

कमी व्याजाच्या गोल्ड लोनने व्यावसायिक उलाढाल शक्य

CD

कोटक महिंद्र बँकेचे अध्यक्ष श्रीपाद जाधव यांचे मत
मुंबई ः गोल्ड लोन (सोने तारण कर्ज) हे सर्वात फायदेशीर व त्वरित मिळणारे कर्ज असूनही ग्राहकांना त्याची पुरेशी माहिती नाही. परतफेड करताना मुद्दल व व्याजदेखील सर्वात शेवटी दिले तरी चालते. दोन तासांत हे कर्ज मिळू शकते. या अशा स्वस्त कर्जाच्या जोरावर व्यवसायाची मोठी उलाढाल होऊ शकते, अशी माहिती कोटक महिंद्र बँकेचे अध्यक्ष (रिटेल, ॲग्री, गोल्ड लोन विभाग) श्रीपाद जाधव यांनी ''सकाळ''ला दिली.
कर्ज घेणाऱ्यांची मनस्थिती सध्या अशी आहे की, अन्य कुठलेही कर्ज न मिळाल्यास गोल्ड लोन घेतले जाते. सध्या वैयक्तिक कर्ज १८ टक्क्यांनी मिळते. व्यावसायासाठी कर्ज किमान १४ ते २४ टक्क्यांनी मिळते. वाहन कर्जही असेच आहे. शैक्षणिक कर्ज निवडक अभ्यासक्रमांसाठीच मिळते. मंजुरीची मोठी प्रक्रिया असून हमीदारही लागतो. पालकांचा सिबिल स्कोर लागतो. त्या तुलनेत सोने तारण कर्जाचा दर केवळ १० ते १२ टक्के असतो. तसेच हे कर्ज पहिल्यांदा घेण्यासाठी सिबिल स्कोअरची आवश्यकता नसते, असेही जाधव म्हणाले.
---
दोन तासांत प्रकिया पूर्ण
रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार सोने तारण कर्ज तत्काळ मंजूर होणारे आहे. सोने घेऊन बँकेत गेल्यावर त्याच्या मूल्याच्या अंदाजे ७५ टक्के कर्ज मिळते. सोन्याचे ग्राहकासमोर मूल्यांकन होऊन वजन केले जाते. केवायसी कागदपत्रे दिल्यावर कर्जाचा करार करावा लागतो. स्टॅम्प ड्युटी भरल्यावर लगेच कर्ज मंजूर होते, लगेच बँक खाते उघडून त्यात पैसे जमा होतात. दोन तासांत ही प्रक्रिया पूर्ण होते; मात्र एवढ्या सोप्या प्रक्रियेची लोकांना म्हणावी तितकी माहिती अद्याप नाही. त्यामुळे या कर्जाचे भारतातील प्रमाण फार कमी आहे, असेही जाधव म्हणाले.
---
देशातील केवळ ७ टक्के सोन्यावर कर्ज
देशात २७ हजार मेट्रिक टन घरगुती सोने आहे, त्यातील फक्त सहा ते सात टक्के सोन्यावर कर्ज घेण्यात आले आहे. हे सोने बँकेत सुरक्षित राहते. कर्ज चुकविले तर किती दंड लागतो, तेही स्पष्ट असते. यापूर्वी अनेक बिगरबँक वित्तसंस्था जादा व्याजदर घेतात; पण आता बँका आपल्या सर्व शाखांमध्ये हे कर्ज आकर्षक व्याजदरात उपलब्ध करून देतात. कर्ज घेतल्यावर दरमहा फक्त व्याजाचा ईएमआय भरावा लागतो, मुद्दल सर्वात शेवटी फेडले तरी चालते तसेच व्याज त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा शेवटी देण्याचेही पर्यायही उपलब्ध असल्याचे जाधव म्हणाले.
---
घरात सोने ठेवण्याऐवजी त्यावर कर्ज घ्या
घरातील वंशपरंपरागत दागिने कोणी मोडतही नाही आणि ते जुन्या फॅशनचे असल्यामुळे वापरतही नाही. असे सोने घरच्या लॉकरमध्ये ठेवण्यापेक्षा गोल्ड लोन घेतल्यास आपल्या व्यवसायात स्थैर्य आणता येईल. तसेच इतर ग्राहकांनाही आपली पत वाढवणे तसेच मुलांच्या शैक्षणिक गरजा वाढवणे शक्य होते. गोल्ड लोन हे स्मार्ट कर्ज असल्याने या कर्जाकडे ग्राहकांनी जरुर लक्ष द्यावे, असे आवाहनही जाधव यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT