मुंबई

धोकादायक इमारतीची पडझड

CD

कल्याण, ता. ३ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील अति धोकादायक, धोकादायक इमारतीचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. असे असतानाही अति धोकादायक, धोकादायक इमारतींवर कारवाई होत नसल्याचे दिसत आहे. कल्याण पश्चिमेकडील अहिल्याबाई चौकातील शिंदे सदन ही चार मजली इमारत पूर्णपणे धोकादायक झाली असून, तिची पडझड होत आहे. इमारतीच्या छताचा, सज्जाचा भाग वारंवार कोसळत असल्याने दुर्घटना घडण्याची भीती आहे. चार वर्षांपूर्वी ही इमारत अतिधोकादायक जाहीर करत रिकामी केली असतानाही तिचे पाडण्यात का येत नाही, असा प्रश्न रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
कल्याण पश्चिमेकडील महापालिका मुख्यालयालगत असलेल्या अहिल्याबाई चौकात शिंदे सदन ही चार मजली इमारत आहे. या इमारतीचा भाग वारंवार कोसळत आहे. इमारतीच्या बाजूलाच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा मंडप आहे. या ठिकाणी दुपारी आणि सायंकाळी आजूबाजूच्या कार्यालयात काम करणारे कर्मचारी विश्रांती घेतात. अशा परिस्थितीत मंगळवारी (ता. २) सकाळच्या सुमारास या इमारतीचा काही भाग मंडपाच्या शेडवर पडला. यात शेडचे सिमेंटचे पत्रे तुटून पडले. या वेळी पत्र्याखाली उभी असलेली मुले आजूबाजूला झाली. मात्र, पत्रा अंगावर पडल्याने त्यांना किरकोळ इजा झाली आहे. या दुर्घटनेनंतर रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली असून, पालिकेने चार वर्षांपूर्वी अतिधोकादायक जाहीर केलेली ही इमारत अद्याप का तोडली नाही, असा प्रश्न विचारला आहे.

शिंदे सदन ही इमारत धोकादायक असून, इमारत मालकाला ती तातडीने तोडण्यासाठी चार ते पाच वेळा नोटिसा पाठवल्या आहेत. तरीही ती तोडली जात नाही. महापालिकेकडून ही इमारत तोडण्याचा निर्णय घेण्याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला असून लवकरच कारवाई केली जाईल
- तुषार सोनवणे, सहायक आयुक्त ‘क’ प्रभाग क्षेत्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

Will Planning: इच्छापत्र : प्रेमाची परंपरा ठेवून जाण्याचा मार्ग

Marathi News Live Updates : पाकिस्तानमध्ये लष्करी ताफ्यावर हल्ल्यात ४ सैनिक ठार

Asian Games: ९ षटकार अन् शतक... Shafali Verma ने विश्वविक्रमासह मोडले ६ मोठे विक्रम; स्मृती मानधनालाही टाकलंय मागे

Input Tax Credit: ‘आयटीसी’ घेण्याची सुविधा स्मार्ट सल्ला

SCROLL FOR NEXT