मुंबई

ठाण्यात फसवणुकीचे एकाच दिवशी तीन गुन्हे

CD

ठाण्यात फसवणुकीचे एकाच दिवशी तीन गुन्हे

ठाणे, ता. ३ (वार्ताहर) : मोबाईल खरेदीसाठी धनादेश देत एक लाख ७७ हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी ठाण्यात पती-पत्नीविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच, बनावट नोंदणी दस्त देऊन शासनाची फसवणूक व बिल्डरद्वारे फ्लॅट बुकिंगमध्ये फसवणूक केली आहे, असे नौपाडा पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ठाण्याच्या एम. जी. रोडवर असलेल्या महालक्ष्मी टेलिकॉम मोबाईल विक्रीच्या दुकानात मोबाईल खरेदीसाठी आलेल्या राजीव व निता नागवेकर यांनी मोतीराम जोगाजी देवासी (वय ३८) यांच्याकडून एक लाख ७७ हजाराचे दोन मोबाईल जानेवारीमध्ये खरेदी केले होते. त्यावेळी त्यांना धनादेश दिला होता, मात्र तो वटला नाही. त्यानंतर त्यांनी रोख रक्कम आणून देतो, असे सांगून पैसे देण्यास टाळाटाळ केल्यामुळे त्यांच्याविरोधात देवासी यांनी तक्रार दाखल केली. तर दुसऱ्या घटनेत संतोष महादेव तायडे यांनी शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दत्तात्रय भोसले व बिल्डर प्रल्हाद कणसे या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फसवणुकीच्या तिसऱ्या घटनेत चाळीस वर्षीय महिला सेसलीन अनिता मेरी सेल्वकुमार यांना एका गुंठ्यामध्ये एका वर्षाच्या आत टू बीएचके बांधून देणार असल्याचे सांगितले. मात्र, त्यांनी दीड लाखाची रक्कम देऊनही त्यांना घर बांधून देण्यात आले नाही. याप्रकरणी कृष्णमूर्ती गणेश याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यावर छगन भुजबळ का बोलत नाहीत? स्वत:च भुजबळांनी सांगितलं कारण

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

Satana News : बागलाणमध्ये सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तहसीलदारांना घेराव

Farmer Rasta Roko : विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; वाहतूक विस्कळीत

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरणात शिवसेना पदाधिकारींच्या अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT