मुंबई

राज्य मार्गावर मोकाट जनावरांची ठाण

CD

राज्य मार्गावर मोकाट जनावरांचे ठाण
कासा-डहाणू रस्ता त्रासदायक; अपघातांचे प्रमाण वाढले

कासा, ता. ३ (बातमीदार) : डहाणू-नाशिक राज्य मार्गांवर पावसाळा सुरू होताच डहाणू ते चारोटीदरम्यान अनेक ठिकाणी मोकाट गुरांनी रस्त्यावर ठाण मांडले आहे. त्यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास होत आहे. रस्त्यावरील वाहनांमुळे अनेक वेळा अपघातही होत आहेत. त्यामुळे यावर तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.
कासा ते डहाणू या जवळपास पंचवीस किलोमीटर अंतरावर दहा ते बारा ठिकाणी मोकाट गुरांचे कळप रस्त्यावर बसत आहेत. या जनावरांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा होत आहे.
प्रामुख्याने कासा, चारोटी, सारणी, रानशेत, गंजाड, कांदोळपाडा, आशागड, संतोषी मंदिर, सावटा या परिसरातील मुख्य रस्त्यावरही गुरांची समस्या निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी ही समस्या निर्माण झाल्याने प्रवास कसा करावा, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
यासाठी बांधकाम विभाग, ग्रामपंचायत प्रशासन व पोलिस प्रशासन यांनी एकत्रित येऊन त्यावर उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनचालक करत आहेत.


पावसाळ्यात मोकाट जनावरांचा रस्त्यावर वावर वाढल्याने याबाबत गटविकास अधिकारी यांच्याशी बोलून चर्चा केली आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींबरोबर बोलून त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
- अभिजित देशमुख, तहसीलदार, डहाणू

कोट -
मोकाट जनावरांच्या कळपाचा फक्त वाहनधारकांनाच त्रास होतो असे नाही, तर अपघात झाल्यामुळे त्याचा फटका जनावरांनाही बसत आहे. मोठ्या वाहनांच्या धडकेत कधी कधी जनावरांचा जीवही जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जनावरांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.
- निवास वरठा, सामजिक कार्यकर्ता, वाहनचालक

कासा ः रस्त्यांवर ठाण मांडून बसलेली मोकाट गुरे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT