मुंबई

व्यावसायिकाची तीन कोटींची फसवणूक

CD

व्यावसायिकाची तीन कोटींची फसवणूक
गाळ्यासाठी घेतलेल्‍या पैशांवर डल्‍ला; अंधेरीतील घटना
अंधेरी, ता. ३ (बातमीदार) ः अंधेरीतील एका इमारतीमध्ये व्यावसायिक गाळ्यांसाठी घेतलेल्या तीन कोटींचा अपहार करून एका व्यावसायिकाची सुमारे तीन कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी साई-सिद्धी डेव्हलपर्स एस्कटाईस प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आणि बिल्डर जयेश विनोदकुमार तन्ना याला आंबोली पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने शुक्रवार (ता. ५) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
या गुन्ह्यात कंपनीच्या इतर चार संचालकांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यात दिप विनोद तन्ना, विवेक जयेश तन्ना, श्रद्धा जयेश तन्ना, हनीता विवेक तन्ना यांचा समावेश आहे. या चौघांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
५१ वर्षांचे तक्रारदार विनोद नरेनदास पंजाबी हे व्यावसायिक त्यांच्या अंधेरीतील न्यू लिंक रोड, इन्फिनिटी मॉलजवळील रेहजा क्लासिक अपार्टमेंटमध्ये राहतात. जून २०१४ रोजी त्यांची जयेश तन्ना याच्याशी ओळख झाली होती. यावेळी जयेशने त्यांना त्यांच्या एका प्रोजेक्टमध्ये स्वस्तात गाळा देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यांच्या या आमिषाला बळी पडून त्यांनी त्याच्या प्रोजेक्टमध्ये तीन व्यावसायिक गाळे बुक केले होते. त्यासाठी तन्ना यांच्या कंपनीला तीन कोटी रुपयांचे पेमेंट केले होते. जयेशने त्यांच्यासोबत तिन्ही व्यावसायिक गाळ्याचा खरेदी-विक्रीचा करार केला होता. त्यापैकी दोन गाळ्यांचे रजिस्ट्रेशन करण्यात आले होते, मात्र वारंवार सांगूनही त्यांनी तिसऱ्या गाळ्याचे रजिस्ट्रेशन केले नाही. दुसरीकडे प्रोजेक्टमध्ये दिलेल्या मुदतीत त्याने त्यांना व्यावसायिक गाळ्यांचा ताबा दिला नाही. विचारणा केल्यानंतर या सर्व संचालकांनी त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला होता. याचदरम्यान त्यांना जयेश तन्नाने अशाच प्रकारे अनेकांना फ्लॅटचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याचे समजले होते. त्यामुळे त्यांनी आंबोली पोलिसांत संबंधित संचालकाविरुद्ध तक्रार केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT