मुंबई

दोन अल्‍पवयीन मुलींवर अत्‍याचार

CD

दोन अल्‍पवयीन मुलींवर अत्‍याचार
बोरिवली, आग्रीपाडा परिसरातील घटना
अंधेरी, ता. ३ (बातमीदार) ः शहरात दोन अल्पवयीन मुलींवर त्यांच्याच परिचित व्यक्तींकडून लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटना बोरिवली आणि आग्रीपाडा परिसरात घडल्या. याप्रकरणी एमएचबी आणि आग्रीपाडा पोलिसांनी लैंगिक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. आरोपींना विशेष पोक्सो कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
पहिल्या गुन्ह्यांतील तक्रारदार महिला ही भायखळा येथे राहते. तिची अकरा वर्षांची पीडित मुलगी भाची असून ती याच परिसरात कुटुंबीयांसोबत राहते. २६ वर्षांचा आरोपी तिचा आतेजावई असल्याने पीडित मुलगी त्याच्या परिचित होती. दोन महिन्यांपासून मुलीशी अश्‍लील चाळे करून जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करत होता. हा प्रकार तिने कोणालाही सांगू नये, यासाठी तिच्या बहिणीला मारहाण करण्याची धमकी देत होता. त्याला कंटाळून तिने हा प्रकार तक्रारदार महिलेला सांगितला. त्‍यानंतर त्‍यांनी आग्रीपाडा पोलिसांना प्रकरणाची माहिती दिली.
दुसरी घटना बोरिवलीत घडली. घरात कोणीही नसल्याची संधी साधून एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच परिचित आरोपीने लैंगिक अत्याचार केला होता. पीडित मुलगी घरकाम करते. शनिवारी रात्री अकरा वाजता ती तिच्या घरी होती. परिचित आरोपीने जबरदस्तीने तिच्या घरात प्रवेश केला. घरात कोणीही नसल्याची संधी साधून त्याने तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार कुणाला सांगू नये, यासाठी धमकी दिली. पीडित मुलीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. काही तासांत साडी विक्रेता असलेल्या ४२ वर्षांच्या आरोपीस पोलिसांनी अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तीस्ता नदी प्रकल्पावरून भारत-चीनमध्ये नवा संघर्ष! चिकन नेकजवळ हालचाली वाढल्या; भारताच्या चिंतेवर ड्रॅगनचं मोठं प्रत्युत्तर

Heavy Rain in Pune Ghats: पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाची जोरदार हजेरी ; भिरा येथे विक्रमी ४०७ मिमी पावसाची नोंद

GBS Virus: कोरोना महामारीनंतर 'जीबीएस'चं संकट, पनवेलमध्ये दोन रुग्ण पॉसिटीव्ह; नेमका आजार काय?

Social Harmony: धर्मापलीकडची माणुसकी! मुस्लिम युवकाच्या वडाची वटसावित्रीला पूजा, गंगापूरमधील वटसावित्री उत्सव ठरला प्रेरणादायी..

महाराष्ट्रातील आरोग्य विभागात ५,२२३ नव्या पदांची मेगाभरती! अनेक जिल्ह्यांतील रुग्णालयांमध्ये जागा भरणार; कुठे आणि कधी?

SCROLL FOR NEXT